शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

अकरावी प्रवेशासाठी जागा २९ हजार; नोंदणी झाली केवळ १६ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 7:32 PM

आॅनलाईन नोंदणीच्या मुदतवाढीनंतरही प्रतिसाद अल्प; जागा रिक्त राहणार

ठळक मुद्देमागील दोन वर्षाप्रमाणे यावर्षीही उपलब्ध जागा आणि नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तुट या नोंदणीला मराठा आरक्षणातील बदलामुळे एक वेळ मुदतवाढही देण्यात आली. 

औरंगाबाद : शहरात ११० महाविद्यालये असून, अकरावी प्रवेशाच्या आॅनलाईन नोंदणीच्या शेवटच्या दिवशी अर्जाचा भाग-२ भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १६ हजार ४८४ एवढी आहे. उपलब्ध जागांचा आकडा २९ हजार १०० एवढा आहे. यामुळे आताच १२ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई, पुण्याच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने देण्यात येत आहेत. मागील दोन वर्षाप्रमाणे यावर्षीही उपलब्ध जागा आणि नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात तूट झाली आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाच्या आॅनलाईन नोंदणीला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आॅनलाईन अर्जाचा भाग-१ भरण्यात येत होता. तर निकाल जाहीर झाल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच १९ जून रोजी अर्जाचा भाग-२ भरण्यास सुरुवात झाली होती. या नोंदणीला मराठा आरक्षणातील बदलामुळे एक वेळ मुदतवाढही देण्यात आली. 

आॅनलाईन नोंदणीची मुदत गुरुवारी (दि.४) सायंकाळी ६ वाजता संपली. भाग-१ भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ७३६ एवढी आहे. भाग-२ भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ४८४ एवढी आहे.  मात्र भाग-२ भरल्यानंतरच विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येते. शहरातील ११० महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांची संख्या ही २९ हजार १०० आहे. त्यामुळे १२ हजार ६१६ जागा नोंदणीपूर्वीच रिक्त राहणार आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकीही अनेक जण तंत्रनिकेतन, आयटीआयसह इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे यावर्षी रिक्त जागांचा आकडा हा १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. 

आज सर्वसाधारण गुणवत्ता यादीअकरावी प्रवेशाच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपल्यामुळे सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीवर आक्षेप घेण्यासाठी ६ ते ८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक यांच्याकडे हे आक्षेप नोंदवावे लागतील. यानंतर पहिली गुणवत्ता यादी १२ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीतील प्रवेश १३ ते १६ जुलैदरम्यान घ्यावे लागणार आहेत.

उपलब्ध जागांची आकडेवारीप्रकार    कला    वाणिज्य    विज्ञान    एमसीव्हीसीअनुदानित    ४८५५    २१८५    ४७२०    १७२०विना अनु.    २१२०    ११६०    ४८४०    ५७०कायम वि.अ.    ०    ०    ६००    १००स्वयंअर्थसाह्य    १४००    १६८०    ३१२०    ३०एकूण    ८३७५    ५०२५    १३,२८०    २४२० 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद