औरंगाबाद : शहर पोलिसांनी आॅटोरिक्षांसाठी ‘मीटर सक्ती’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, उद्यापासून (१५ मार्च) त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या मोहिमेमुळे टप्पा वाहतूक (सीटर) पद्धत बंद होणार आहे. एक तर शहर बसची अपुरी संख्या, त्यातच सीटर रिक्षा बंद होणार असल्याने केवळ मीटरनेच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.हेल्मेट सक्ती मोहीम राबविल्यानंतर आता पोलिसांनी रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचा विडा उचलला आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही रिक्षाचालकांमुळेच बिघडली असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मात्र, कितीही म्हटले तरी अपुऱ्या बससेवेमुळे गेल्या दोन दशकांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर रिक्षाचालकांचे राज्य आहे. आजघडीला २५ हजारांच्या वर रिक्षा शहरात धावतात. त्यातून दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक प्रवास (पान २ वर)रेल्वेस्टेशन ते सिडको बसस्थानक : मीटर रिक्षाने जवळपास ११२ रुपये तर शेअरिंग रिक्षाने जवळपास १४९ रुपये.४मध्यवर्ती बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट : मीटर रिक्षाने जवळपास १६८ रुपये तर शेअरिंग रिक्षाने जवळपास २२४ रुपये.रिक्षांना आता कोणत्याही उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यांवरून जाता येणार नाही. पुलावरून जावे लागेल. पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे प्रवासी बसवावे, उतरावे लागतील.तीनपेक्षा अधिक प्रवासी बसविले तर कारवाई होईल.४विनागणवेश रिक्षा चालवताना आढळला तर दंड भरावा लागेल.सध्या मीटर रिक्षात बसल्यावर प्रारंभी १४ रुपये त्यानंतर प्रती कि.मी. साठी १४ रुपये असा दर आकारला जात आहे, तर शेअरिंग रिक्षासाठी मीटरने झालेल्या रकमेवर अतिरिक्त ३३ टक्के रक्कम लावली जाते. ही रक्कम तिघा प्रवाशांमध्ये वाटून घेतली जाते, असे रिक्षाचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले
‘सीटर’ बंद ‘मीटर’ सुरू
By admin | Published: March 15, 2016 12:46 AM