लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीतील वादानंतर शहरातील मोर चौक भागात भाजपाचे पराभूत उमेदवार बाळू खोमणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता़ या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली असून अद्यापही दोघे जण फरार आहेत़चौफाळा भागातील भाजपाचे उमेदवार बाळू खोमणे यांचा महापालिका निवडणुकीच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद झाला होता़ त्यानंतर १८ आॅक्टोबर रोजी खोमणे हे भाजपाचे मिलिंद देशमुख यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी आले होते़ देशमुख यांना भेटल्यानंतर ते मोर चौकातून जात असताना, त्यांच्यासह अन्य एका जणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता़ या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता़ परंतु घटनेनंतर आरोपी फरार होते़ त्यात २८ आॅक्टोबर रोजी भाग्यनगर पोलिसांनी हैदराबाद येथून विशाल राजू कानोजी या आरोपीला अटक केली होती़ त्यानंतर संतोष कदम याला हिंगोली जिल्ह्यातील येहळेगाव येथून अटक करण्यात आली़ त्यामुळे अटक आरोपींची संख्या आता दोन झाली असून अद्यापही दोन आरोपी फरार आहेत़
हल्ला प्रकरणातील दुसरा आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:45 AM