शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

अंगावरील हळद उतरली नाही तोच लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी युवकाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 3:40 PM

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.  

औरंगाबाद: लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात समोर आली. जीवन सोनाजी भोसले असे मृत युवकाचे नाव आहे. अंगावरील हळद उतरली नाही तोच युवकाने जीवनयात्रा संपवाल्याने खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन सोनाजी भोसले हा समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर होता. मंगळवारी दुपारी कचनेर येथे रुपाली घोरपडे सोबत त्याचा विवाह झाला. लग्नानंतर संध्याकाळी सर्वजण ब्रिजवाडी येथील आपल्या घरी आले. यानंतर आज पहाटे तो झोपेतून उठला आणि वडिलांजवळ जाऊन बसला. थोड्यावेळाने ६ वाजेच्या सुमारास दुचाकीवर जीवन घराबाहेर पडला.  रेल्वेस्टेशन परिसरात आला. याच एक पॅसेंजर रेल्वे स्थानकाकडे येत असल्याचे पाहून त्याने त्याच्या समोर उडी घेतली. दरम्यान, बराच वेळ झाल्यानंतरही जीवन घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरु केला. यावेळी काहीजणांनी तो मुकुंदवाडीकडे गेल्याचे सांगितले. नातेवाईकांनी या परिसरात शोध घेतला असता त्याची गाडी रेल्वे पटरीजवळ आढळून आली. काही अंतरावर रेल्वेपटरीवर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

जीवनला समाजकार्याची आवड होती. तो ब्रिजवाडी परिसरातील सर्व सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेत असे. लग्नाला एक दिवसही झालेला नसताना त्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.