लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पूर्व) परीक्षा २०१७ बीड जिल्ह्यातील २८ मे रोजी पार पडत आहे. ४२९६ उमेदवार परीक्षा देणार असून, १३ उपकेंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.भगवान विद्यालय, चंपावती माध्यमिक विद्यालय, संस्कार विद्यालय, मिल्लिया कला व विज्ञान (मुलांचे) महाविद्यालय, गुरूकूल इंग्लिश स्कूल, शिवाजी विद्यालय, बलभीम महाविद्यालय, द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटेक्निक, मिल्लिया गर्ल्स हायस्कूल, स्वा. सावरकर माध्यमिक विद्यालय, डॉ. बापुजी साळुंखे हायस्कूल, श्री छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय या केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, परीक्षा केंद्र व परिसरात कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी १४४ कलम लागू करण्यात आल्याचे बीडचे उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
१३ उपकेंद्रांवर दुय्यम निरीक्षक परीक्षा
By admin | Published: May 26, 2017 11:19 PM