लोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद/औरंगाबाद : मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.शरद कळसकर (२५,रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शरदला अटक केल्याची माहिती मुंबई एटीएसने त्याच्या नातेवाईकांना फोन करून दिली. त्याच्यावरील आरोप काय, हे मात्र पोलिसांनी सांगितले नसल्याचे त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले की, शरदचे प्राथमिक शिक्षण केसापुरीत झाले. अकरावी, बारावीसाठी तो औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालयात होता. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. चार वर्षांपूर्वी तो चांगले शिक्षण घेतो आणि कामधंदा शोधतो, असे सांगून घरातून गेला होता. तो एप्रिल महिन्यात नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा कोल्हापूरला गेला. लेथ मशीन फिटरचे काम करीत असल्याचे त्याने घरी सांगितले होते. त्याचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यांना ५ एकर शेतजमीन आहे. त्याची आई, एक लहान भाऊ आणि विवाहित मोठी बहीण शेती व्यवसाय करतात. शरदचे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी संबंधित असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून समजली. एटीएसच्या अधिकाऱ्यांचे पथक आज सकाळी केसापुरी येथे जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या अधिकाºयांनी याबाबत मात्र दुजोरा दिला नाही.मोबाईल वापरत नव्हताच्शरद हा मोबाईल वापरत नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये तो साधना नावाच्या कंपनीत कामाला होता, असे त्याने घरी सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो सहा-सात महिन्यांतून एकदा गावी यायचा. त्यावेळी दहा ते पंधरा हजार रुपये आई-वडिलांना देऊन परत जात. कोल्हापुरात स्वत:चा उद्योग उभारायचा असे त्याने घरी सांगितले होते. मात्र, त्याला पकडल्याचे कळल्याने नातेवाईकांना धक्काच बसला. एटीएसने पकडलेला एक साधक औरंगाबाद जिल्ह्यातीललोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद/औरंगाबाद : मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासाठी जातो, असे सांगून कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.शरद कळसकर (२५,रा. केसापुरी, ता. औरंगाबाद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शरदला अटक केल्याची माहिती मुंबई एटीएसने त्याच्या नातेवाईकांना फोन करून दिली. त्याच्यावरील आरोप काय, हे मात्र पोलिसांनी सांगितले नसल्याचे त्याचे वडील भाऊसाहेब कळसकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. ते म्हणाले की, शरदचे प्राथमिक शिक्षण केसापुरीत झाले. अकरावी, बारावीसाठी तो औरंगाबादेतील विवेकानंद महाविद्यालयात होता. त्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. चार वर्षांपूर्वी तो चांगले शिक्षण घेतो आणि कामधंदा शोधतो, असे सांगून घरातून गेला होता. तो एप्रिल महिन्यात नातेवाईकाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा कोल्हापूरला गेला. लेथ मशीन फिटरचे काम करीत असल्याचे त्याने घरी सांगितले होते. त्याचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यांना ५ एकर शेतजमीन आहे. त्याची आई, एक लहान भाऊ आणि विवाहित मोठी बहीण शेती व्यवसाय करतात. शरदचे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी संबंधित असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून समजली. एटीएसच्या अधिकाºयांचे पथक आज सकाळी केसापुरी येथे जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या अधिकाºयांनी याबाबत मात्र दुजोरा दिला नाही.मोबाईल वापरत नव्हताच्शरद हा मोबाईल वापरत नव्हता, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरमध्ये तो साधना नावाच्या कंपनीत कामाला होता, असे त्याने घरी सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो सहा-सात महिन्यांतून एकदा गावी यायचा. त्यावेळी दहा ते पंधरा हजार रुपये आई-वडिलांना देऊन परत जात. कोल्हापुरात स्वत:चा उद्योग उभारायचा असे त्याने घरी सांगितले होते. मात्र, त्याला पकडल्याचे कळल्याने नातेवाईकांना धक्काच बसला.
एटीएसने पकडलेला एक साधक औरंगाबाद जिल्ह्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:14 AM