छत्रपती संभाजीनगर : महावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत की, ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरली; पण बिल भरण्याच्या देय दिनांकानंतर बिल भरल्याने त्यांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला. यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. व्यावसायिक ग्राहकांची संख्या १ लाख ३३ हजार आहे तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १७ हजार आहे.
जिल्ह्यात सुमारे १० लाख घरगुती वीजग्राहकजिल्ह्यात ९८१८९९ घरगुती ग्राहक आहेत. यापैकी सुमारे साडेसहा लाख लाख ग्राहकांनी बिल भरले; पण मुदत न पाळल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला. वेळेच्या आत बिल भरून दंड टाळता येऊ शकतो.
मुदतीनंतर बिल भरल्यास दंडमहावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत की, ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरली; पण बिल भरण्याच्या देय दिनांकानंतर बिल भरल्याने त्यांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला. यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत.
दोन महिन्यांचे बिल थकले तर तोडली जाते वीजमहावितरणच्या वीज बिलावर मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो. बिल अथवा देयक दिनांकापासून २१ दिवसांत बिल भरायचे असते. त्याची स्पष्ट मुदत देय दिनांक नावाने दिलेली असते. त्यानंतर बिल भरले तर सव्वा टक्का दंड द्यावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी देय दिनांक (ड्यु डेट) पर्यंतच बिल भरावे. अनेकदा दंड न भरल्यास वीज तोडली जाते.
थोडीशी सवलत मिळण्याचे मार्गमहावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाइन पेमेंट व गो ग्रीनची सुविधा वापरली तर त्यांना वीजबिलात सवलत मिळते. वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. बिल ऑनलाइन भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई-मेलने बिल स्वीकारण्याचा गो-ग्रीनचा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.- महावितरण अधिकारी