फोटो आहे
--------------------------
म्हाडा कॉलनीतील पथदिवे बंदावस्थेत
वाळूज महानगर : म्हाडा कॉलनी परिसरात पथदिवे गत पंधरा दिवसांपासून बंदावस्थेत असल्याने नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. या कॉलनीतील मारुती मंदिराजवळील पथदिवे बंद असल्याने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या भागातील बंद पडलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून केली जात आहे.
--------------------------------
रांजणगावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगावातुन १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ती अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जाते असे म्हणून गेली होती. मात्र, ती घरी न परल्याने तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
----------------------
कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या पार्किंगमधुन दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय परसरसाठ राठोड (रा. बजाजनगर) या कामगाराने बुधवारी दुचाकी (एम.एच. २९, ए.एफ. ६१३३) कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. चोरट्याने संधी साधुन ही दुचाकी लांबविली.
-----------------------
रांजणगावच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रस्त्याची दोन्ही बाजूने दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी अमरदीप श्रीखंडे, अनिलकुमार जाधव, आदींनी केली आहे.
----------------------