लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना जगाची भाषा ज्ञात झाली पाहिजे, या उद्देशाने बीड जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सेमी इंग्रजीचे शिक्षण या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी घेतला आहे.शिक्षण क्षेत्रात वाढलेली प्रचंड स्पर्धा, या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळाले पाहिजे, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण क्षेत्रात शाळांची वाढती संख्या, त्यातच इंग्रजी माध्यमाच्या वाढणाऱ्या शाळा यामुळे ग्रामीण भागातील शाळा ओस पडू लागल्या आहेत. इंग्रजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने पालकांचीही पसंती दिवसेंदिवस इंग्रजी शिक्षणाबाबत वाढू लागल्याने जि.प.च्या शाळांना उतरती कळा प्राप्त झाली. ही स्थिती बदलण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी बीड जिल्ह्यात एकूण २५६६ प्राथमिक शाळा आहेत. यापैकी केवळ ५० शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाले. या शाळांना प्रतिसादही चांगला मिळाला. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाले तर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवाहाबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षणाची सुविधा सहज उपलब्ध झाल्यास शाळेतील होणारी गळती निश्चितच या माध्यमातून दूर होईल, या उद्देशाने हा उपक्रम गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
जि.प.च्या शाळांमध्ये सेमीइंग्रजी
By admin | Published: May 27, 2017 10:58 PM