शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

सेनेने लावले भाजपमध्ये भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:11 PM

महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपमध्ये भांडण लावून दिले. सेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे तसेच जयश्री कुलकर्णी या दोघांनाहीसूचक-अनुमोदक दिले. शिंदे यांनी शनिवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी कुलकर्णी यांनीही शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या आदेशावरून अर्ज भरून सभापतीपदावर दावा केला.

ठळक मुद्देसभापती निवडणूक : भाजपच्या दोन उमेदवारांना दिले सूचक-अनुमोदन

औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपमध्ये भांडण लावून दिले. सेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे तसेच जयश्री कुलकर्णी या दोघांनाहीसूचक-अनुमोदक दिले. शिंदे यांनी शनिवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी कुलकर्णी यांनीही शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या आदेशावरून अर्ज भरून सभापतीपदावर दावा केला.स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक ४ जून रोजी होत आहे. शिवसेना-भाजप युतीतील करारानुसार यंदा सभापतीपद भाजपकडे देण्यात आले आहे. सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपचे पालिकेतील गटनेते प्रमोद राठोड यांनी सकाळी सेना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेते विकास जैन, सेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती.भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा निरोप दुपारी पालिकेत धडकला. त्यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून जयश्री कुलकर्णी या भाजपच्या उमेदवार असल्याची माहिती दिली. त्यामुळे सेनेचे नेतेही क्षणभर अवाक झाले. त्यानंतर जयश्री कुलकर्णी यांनी सेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, गजानन बारवाल आदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तासाभरात दुसºया सदस्याचा अर्ज दाखल झाल्याने भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.सेनेचा डबल गेमराजू शिंदे यांच्या दोन अर्जावर सेनेचे राजेंद्र जंजाळ आणि भाजपचे पूनम बमणे व गजानन बारवाल यांची सूचक-अनुमोदक म्हणून नावे आहेत. तर जयश्री कुलकर्णी यांच्या अर्जावर सेनेचे नगरसेवक कमलाकर जगताप, सीमा चक्रनारायण, शिल्पाराणी वाडकर आणि सचिन खैरे सूचक- अनुमोदक म्हणून नावे आहेत. स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी सेनेने शुक्रवारी दोन अर्ज घेतले होते. ‘मातोश्री’कडून निवडणूक लढविण्यासंदर्भात कोणतेच आदेश नव्हते. त्यामुळे सेनेने शनिवारी तलवार म्यान केली.कोºया अर्जावर सह्याभाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी कोºया अर्जावर आमच्या सह्या घेतल्या. आम्ही भाजपच्या अधिकृत उमेदवारासोबत आहोत, असे स्थायी समितीतील भाजपचे सदस्य गजानन बारवाल यांनी सांगितले. अधिकृत उमेदवार कोण याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती.प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या पाठीशीभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी राजू शिंदे यांच्या नावाचा अर्ज भरण्याचा आदेश शुक्रवारी पालिकेतील गटनेत्यांना दिला होता. सभापतीपदासाठी ४ जून रोजी सकाळी १०.३० वाजता निवडणूक होणार आहे. त्याच वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सुरुवातीला ३० मिनिटांचा अवधी दिला जातो. त्यामुळे आता पक्षाकडून कोणाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना