शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

बँकेला ई-मेल पाठवून १० लाखांचा गंडा घातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:25 AM

बँकेला ई-मेल पाठवून दिल्लीच्या बँक खात्यात दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे टाकण्याचे सांगून बँकेची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जुलै रोजी समर्थनगरातील आयडीबीआय बँकेत घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बँकेला ई-मेल पाठवून दिल्लीच्या बँक खात्यात दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे टाकण्याचे सांगून बँकेची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जुलै रोजी समर्थनगरातील आयडीबीआय बँकेत घडली.या शाखेचे सहायक व्यवस्थापक सुशील श्रीकृष्ण पांडे यांच्या बँकेला ५ जुलै रोजी सकाळी १०.०६ वाजता देवगिरी बँक व्यवस्थापकाच्या मेलवरून ई- मेल प्राप्त झाला. या ई- मेलमध्ये दिल्लीच्या गौरी इंटरप्रायजेसच्या खात्यात दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करण्याचे कळविण्यात आले. त्यानुसार बँकेने लगेच दहा लाख रुपये त्या खात्यात जमा केले. ही रक्कम टाकल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी देवगिरी बँकेच्या व्यवस्थापकाला फोन करून तुमच्या मेलनुसार आम्ही संबंधित खात्यात दहा लाख रुपये टाकल्याचे सांगितले. देवगिरी बँकेच्या व्यवस्थापकाने आम्ही अशा प्रकारचा ई- मेल पाठविला नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेच दिल्ली येथील संबंधित बँकेशी संपर्क साधून बँकेने वर्ग केलेले दहा लाख रुपयांचे पेमेंट करू नये, असे कळविले. मात्र तोपर्यंत गुन्हेगारांनी ३ लाख ४० हजार रुपये काढून घेतले होते. उर्वरित रक्कम वाचली. पांडे यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड तपास करीत आहेत.

टॅग्स :bankबँक