औरंगाबाद : थायलंडमधील बँकॉक येथे १७ ते २२ जूनदरम्यान होणाऱ्या सिनिअर एशियन तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या संघात २२ खेळाडू, ९ प्रशिक्षक आणि एका व्यवस्थापकाचा समावेश आहे.एशियन स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात शिबीर सुरू आहे. निवडण्यात आलेला भारतीय तलवारबाजी संघ पुढीलप्रमाणे : वेलाउथम विनोथकुमार, बिकी टी., अर्जुन, राकेश राज, सुनील कुमार, एन. संतोषसिंग, जयप्रकाश सी., उदवीरसिंग, करणसिंग, पद्मा निधी, सुरेंद्रोसिंग, वरिंदरसिंग, राधिका औटी, बिंदू देवी, थोम्बी देवी, जास्मीन, टी. देवी, इना अरोरा, जसरितसिंग, ज्योतिका दत्ता, डी. देवी, कोमलप्रीत शुक्ला, जोस जोत्स्ना ख्रिस्ती, भवानी देवी. प्रशिक्षक : बी. ओलेग, विजय कुमार, अश्विनी माहित, अशोक कुमार, सागर लागू, अश्विनी कुमार, व्यवस्थापक : बशीर अहमद खान, आरतीसिंग, फिजियो थेरेपिस्ट, देविका न्यायाधीश.या संघाला तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, सचिव बशीर अहमद खान, कोषाध्यक्ष अशोकजी दुधारे, सहसचिव डॉ. उदय डोंगरे, साईचे संचालक वीरेंद्र भांडारकर, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, खेलो इंडियाचे प्रतिनिधी राजिंदरसिंग पठाणिया, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, गोकुळ तांदळे, जिल्हा सचिव डॉ. दिनेश वंजारे, शरद कचरे, संजय भूमकर, तुकाराम म्हेत्रे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे आदींनी शुभेच्छा दिल्या.
भारताचा तलवारबाजी संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:14 AM