१९७० च्या दशकात आरिफ शेख यांनी शहरातील प्रसिद्ध उर्दू दैनिक 'औरंगाबाद टाइम्स' पासून पत्रकारितेला सुरुवात केली होती. संस्थापक-संपादक अझीझ खुसरो यांच्यासोबत त्यांनी उर्दू पत्रकारितेत भक्कम पाया रचला. आठ ते दहा वर्षे याठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी इंग्रजी वृत्तसंस्था युएनआयमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी 'इंडियन एक्सप्रेस' मध्ये स्वतंत्र पत्रकारिता केली. मुंबईत 'मिड डे' दैनिकात त्यांनी दोन वर्षे काम केले. हरहुन्नरी स्वभाव असलेल्या आरिफ शेख यांनी परत औरंगाबाद शहरात काम करण्याचा निर्णय घेतला. उर्दू , इंग्रजीनंतर त्यांनी थेट 'सिटीझन' या हिंदी दैनिकात अनेक वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे पब्लिक एक्सप्रेस पाक्षिक काढले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती थोडीशी खराब होती. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गंजे शहीदा येथील मशिदीमध्ये रात्री नमाज-ए- जनाजा तर याच परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार आरिफ शेख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:05 AM