शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

औरंगाबाद महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीच कामचुकार - प्रभारी मनपा आयुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:00 PM

शहरातील कचरा प्रश्नात सफाई मजूर, निरीक्षक चांगले काम करीत आहेत. कामचुकारपणा फक्त वरिष्ठच करीत असून, आज तातडीच्या बैठकीला गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्नात सफाई मजूर, निरीक्षक चांगले काम करीत आहेत. कामचुकारपणा फक्त वरिष्ठच करीत असून, आज तातडीच्या बैठकीला गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. सुट्टीच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी मुख्यालय सोडून बाहेरगावी जातात कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

रविवारी सुट्टीच्या दिवशीही प्रभारी आयुक्तांनी रात्री ७ वाजता मनपा मुख्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला सर्व वॉर्ड अधिकारी, जवान, निरीक्षक उपस्थित होते. वॉर्डनिहाय कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला. सफाई मजूर आणि जवानांनी कर्मचारी अपुरे असल्याची ओरड केली. एका वॉर्डाची लोकसंख्या जवळपास ८ ते १० हजारांपर्यंत आहे. एका वॉर्डाला ७ ते ८ मजूर देण्यात आले आहेत. प्रत्येक घरातून वर्गीकरण केलेला कचरा गोळा करेपर्यंत दुपारचे दोन वाजतात. कर्मचारी वाढवावेत, अशी सूचना त्यांनी केली. प्रभारी आयुक्तांनी यावेळी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

शहरात ज्या ठिकाणी कचरा पडून आहे, त्याचे वर्गीकरण करण्यासाठी कचरा वेचकांची मानधनावर नियुक्ती करा. त्यांना ग्लोज, गमबूट आदी साहित्य द्या. सफाई मजुरांची संख्या वाढवा, ज्या वॉर्डांमध्ये पीट तयार केले आहेत, तेथे पावसाळ्यात भयंकर त्रास होईल. आतापासूनच तेथे शेड किंवा बांधकाम करण्यात यावे. प्लास्टिक बंदीसाठी सोमवारपासून पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येईल. ज्या वॉर्डांमध्ये कचर्‍याचे वर्गीकरण होत नाही, तेथे नागरिकांना समजावून सांगा. त्यांचे योग्य प्रबोधन करावे. व्यापारी भागात रात्री कचरा उचलण्याची पद्धत सुरू करावी. या कामामुळे दुभाजकांवर साचणारा कचरा साचणार नाही. शहरातील ३० टक्के वसाहतींमध्येच कचर्‍याचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: जुन्या शहरात. नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

अतिरिक्त आयुक्तांवर रोषमनपातील अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग नगर जिल्ह्यातील आहेत. शनिवारी पालकमंत्री शहरात असल्याने त्यांना गावी जाता आले नाही. रविवारी सकाळी ते मुलाबाळांना भेटण्यासाठी निघून गेले. त्यामुळे बैठकीला ते हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे प्रभारी आयुक्तांनी कोणाचे नाव न घेता मुख्यालय सोडून बाहेरगावी जाणार्‍या आणि बैठकीला गैरहजर राहणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांना नोटीस बजावण्याचे आदेशही सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांना दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNavalkishor Ramनवलकिशोर रामAurangabadऔरंगाबाद