शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहुल; प्रशासनाच्या युध्दपातळीवर हालचाली सुरु, लॉकडाऊनचे निर्बंध पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 12:33 PM

Corona Virus in Aurangabad : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

ठळक मुद्देवर्कसाईटवर किंवा उत्पादन ठिकाणी काही कामगारांची राहण्याची व्यवस्था जर उद्योजकांना करता आली तर त्या अनुषंगाने तयारी करण्यात येणार आहे. ९६ टक्के बेड्स सध्या उपलब्ध असून, नवजात शिशू आणि बाल कोविड सेंटरची तयारी प्रशासनाने केली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेची चाहुल तसेच नवीन विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना चाचण्या वाढविणे, सकाळी ७ ते ४ या वेळेचे सर्वांनी निर्बंध पाळणे, ९६ टक्के बेड्स सध्या उपलब्ध असून, नवजात शिशू आणि बाल कोविड सेंटरची तयारी प्रशासनाने केली आहे. २ हजार ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी पूर्ण झाली आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. येत्या एक - दोन दिवसांत उद्योजकांची बैठक घेण्यात येणार आहे. वर्कसाईटवर किंवा उत्पादन ठिकाणी काही कामगारांची राहण्याची व्यवस्था जर उद्योजकांना करता आली तर त्या अनुषंगाने तयारी करण्यात येणार आहे. कामगारांचे अप - डाऊन कमी झाले तर त्याचा फायदाच होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी कोविड उपाययोजनांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतली. बैठकीला जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवापुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता ठेवण्याची खबरदारी घ्यावी. सर्व रुग्णालयांना इलेक्ट्रीक ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट आणि फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या असून, त्याचा आढावा घेऊन संपर्क अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा. ज्या रुग्णालयांनी ऑडिट केलेले नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. साथीच्या आजाराची उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

खासगीत नियमानुसार शुल्क घ्यावेज्या खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी मागितलेली आहे. त्यांना परवानगी देण्यात यावी. मात्र, सर्वांनी नियमानुसारच लसीकरण शुल्क आकारणे बंधनकारक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

१५ जुलैपासून ८वी ते १२वी वर्ग सुरू करणारशासन निर्देशानुसार १५ जुलैपासून ग्रामीण भागातील ८वी ते १२वीपर्यंतचे शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात येणार असून, शिक्षकांच्या चाचण्या, लसीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. सरपंच, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या समिती माध्यमातून नियोजन करावे. ज्या गावात ३० दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही. त्याच गावात शाळा सुरू करावयाची आहे. रुग्ण आढळल्यास वर्ग बंद करण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल, असे जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले म्हणाले. तसेच रुग्ण असलेल्या गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांची चाचणी करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

चाचण्या वाढविण्याचे आदेशचाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असून, संसर्गाचा फैलाव त्यामुळे रोखता येईल. कोरोनाच्या संसर्ग प्रमाणानुसार जिल्हास्तर तीनमध्ये असून, निर्बंध, अटी, शर्ती यापुढे कायम राहणार आहेत. जिल्ह्यातील बाधित दर २.७९ टक्के असून, संभाव्य डेल्टा प्लसच्या संसर्गाची तीव्रता अधिक असल्याने चाचण्यांचे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. रोज पाच हजारांपर्यंत चाचण्यांत वाढ करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जनतेला प्रशासनाचे आवाहनकोरोना संसर्ग वाढणार नाही, यासाठी जनतेने सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा. यादृष्टीने सकस आहार, प्राणायाम, योगासने, सकाळ, संध्याकाळ चालण्याचे व्यायाम करावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद