औरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ख्याती वेदर मॉडिफिकेशनचे आणखी एक विमान आज, १६ आॅगस्ट रोजी विमानतळावर दाखल होणार आहे.पश्चिम महाराष्ट्रात प्रयोग करण्याची फारशी गरज नसल्याने मराठवाड्यात पूर्ण क्षमतेनेकृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ६ तासांपेक्षा अधिक प्रवासाची क्षमता असणारे विमान येईपर्यंत कंपनीचे सोलापूर येथील विमान औरंगाबाद येथून प्रयोगासाठी वापरले गेले. सी-९० या विमानाआधारे ‘ट्रायल रन’ घेण्यात आला. दोन दिवस उड्डाण घेऊन पावसासाठी प्रयत्न करण्यात आला.दरदिवशी ५७ लाखांचा खर्च३० कोटी रुपयांतून कृत्रिम पावसाचा प्रयोग मराठवाड्यात करण्यात येत आहे. ९ आॅगस्टपासून ५२ दिवस हा प्रयोग चालेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रयोगासाठी ख्याती क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टंट या कंपनीला कंत्राट देण्यात आले.हा प्रयोग ५२ दिवस चालणार असून, प्रतिदिन साधारणत: ५७ लाख रुपये विमान, शास्त्रज्ञांवर खर्चाचे प्रमाण आहे. सहा दिवसांत साडेतीन कोटी रुपये खर्च झाल्याचा हिशेब वरील अनुमानावरून येतो.१०० तास क्लाऊड सीडिंग करण्यात येणार आहे. त्यावर १०० तास मोफत असणार आहेत.
औरंगाबादला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी स्वतंत्र विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 3:37 AM