तुळजापूर : शनिवारी श्री तुळजाभवानीची वेगळ्या पद्धतीची अलंकार पूजा मांडण्यात आली होती. या अलंकार पूजेत देवीच्या हिरेजडीत सुवर्ण मुकुटाखाली कपाळी ‘जगदंब जगदंब’ असे शब्द लिहिण्यात आले होते. त्यामुळे तुळजाभवानीच्या नित्योपचार अलंकार पूजापेक्षा वेगळी पूजा दिसून येत होती. या संदर्भात भोपी पुजारी अतुल मलबा यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अक्षय्यतृतियेनंतरचा नववर्षाचा आजचा पहिला दिवस. या दिवसापासून भाविकांनी तुळजाभवानीचे जगदंब जगदंब नावाने दररोज स्मरण करावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानीचे ‘जगदंब’ या नावाने सातत्याने स्मरण करीत होते, त्यामुळे देवीच्या कपाळी मळवटाने जगदंब हा शब्द लिहिला आहे.
तुळजाभवानीची आगळी-वेगळी पूजा
By admin | Published: April 29, 2017 11:45 PM