शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गंभीर मुद्दा! मराठवाड्यात रोज तीन शेतकरी संपवतात जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

By विकास राऊत | Published: January 19, 2024 11:45 AM

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गंभीर होत असून २०२३ या वर्षात दरमाह ९०, तर रोज ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. वर्षभरात १ हजार ८८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६९, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८२ आत्महत्या झाल्या. दरम्यान, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांसाठी दिलेला अहवाल सहा महिन्यांपासून अडगळीला पडला आहे.

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले. परिणामी खरीप आणि रब्बी हंमागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतीचे उत्पादन घटणे, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे २०२३ या वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे बोलले जाते.

२०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले होते. २०२३ मध्ये जानेवारी ते मे या काळातही अवकाळीमुळे पिकांचेही नुकसान झाले. शासन मदतीची घोषणा ऑनलाइनच्या कचाट्यात अडकली. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही. २०२२ मधील सततच्या पावसाने केलेल्या नुकसानीची मदत अजूनही मिळालेली नाही. गेल्या मान्सूनमध्ये सुमारे दीड महिना पावसाचा खंड पडल्याने उत्पादन घटले. मराठवाड्याची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. ही सगळी कारणे शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरली.

मागील चार वर्षांतील आकडे असेवर्ष.......शेतकरी आत्महत्या२०२०...... ७७३२०२१...... ८८७२०२२.......१०२२२०२३......१०८८

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्याजिल्हा............ आत्महत्याछत्रपती संभाजीनगर.. १८२जालना.......७४परभणी....१०३हिंगोली....४२नांदेड.... १७५बीड...२६९लातूर...७२धाराशीव...१७१एकूण....१०८८

संवेदनाशून्यतेमुळे हे सगळे घडतेय...वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन सुरू आहे की बंद हे माहिती नाही. राजकीय नेते, प्रशासन संवेदनाशून्य झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या, उपाययोजनांकडे कुणी लक्ष देत नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले जात आहे. त्यांनी काय पिकवावे, कुठे विकावे, महागाईचा त्यांना काय फटका बसतोय, निसर्गाच्या प्रकोपातून ते कसे वाचतील यावर विचार करण्याची कुणाचीही इच्छा दिसत नाही.- किशोर तिवारी, माजी अध्यक्ष वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाfarmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्र