शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ‘व्हेंटिलेटरवर’; ‘एमपीएससी’मार्फत जागा भरणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:53 AM

‘कायम’चा प्रस्ताव कागदावरच; आज ना उद्या कायमस्वरुपी होऊ, या आशेने १० ते १२ वर्षांपासून त्यांच्याकडून सेवा दिली जात आहे.

औरंगाबाद : राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील तात्पुरत्या स्वरुपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ‘व्हेंटिलेटरवर’ आली आहे. आज ना उद्या कायमस्वरुपी होऊ, या आशेने १० ते १२ वर्षांपासून त्यांच्याकडून सेवा दिली जात आहे. मात्र, आता वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. याविषयी संताप व्यक्त होत आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी (गट-ब) या संवर्गातील ४२७ पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. अनेकजण गेल्या १२ वर्षांपासून या पदांवर तात्पुरत्या स्वरुपावर काम करत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. अनेकांचे वय वाढल्यामुळे ‘एमपीएससी’साठीही ते अपात्र ठरणार आहेत, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

राज्यातील स्थितीराज्यभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५७२ पदे रिक्त आहेत. या पदांवर तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले. एकट्या औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपातील २२ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

‘ब’ ऐवजी ‘अ’ गटाची तयारी करू‘एमपीएससी’मार्फतच जर भरती होणार असेल तर गट - ब संवर्गातील पदांऐवजी गट - अ संवर्गातील पदांसाठी तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ, असाही सूर सध्या उमटत आहे.

मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावातात्पुरत्या स्वरुपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा प्रस्ताव चारवेळा दिलेला आहे. राज्यातील १०६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादीही अंतिम करण्यात आली होती. अशात आता ‘एमपीएससी’तर्फे जागा भरण्यात येत आहेत. प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावून मुुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय द्यावा.- डाॅ. विकास राठोड, सचिव, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय संघटना

नियमित करण्याची मागणीगेल्या १२ वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. कोविड काळात ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम केले, त्यांना नियमित करण्याची मागणी आहे. त्यांना नियमित केले तर अनेकांना दिलासा मिळेल.- डाॅ. भारत सोनवणे, अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षक संघटना

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरState Governmentराज्य सरकार