औरंगाबाद : घाटी रुग्णालयात २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्यात यावा, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सोमवारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली. यावेळी घाटी आणि दूध डेअरीच्या जागेवर एमसीएच विंगचा स्वतंत्र प्रकल्प होईल, असे आरोग्यमंत्री म्हणाल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले.घाटी रुग्णालयात माता व बाळाला एकाच छताखाली उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्याची योजना आखण्यात आली होती. जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याच परिसरात एमसीएच विंग उभारण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. परिणामी, घाटीतील प्रस्तावित एमसीएच विंग बारगळण्याची भीती व्यक्त करण्यात आली.घाटी रुग्णालयात मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे हा विभाग घाटीतच झाला तर अधिक फायदेशीर ठरू शकतो, असे घाटी प्रशासनाचे म्हणणे आहे. दुष्काळी दौऱ्यानिमित्त आणि गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीसाठी डॉ. दीपक सावंत हे सोमवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी त्यांची भेट घेऊन हा विभाग घाटीतच करण्याची मागणी केली.घाटीत होणारचआरोग्यमंत्र्यांनी घाटी आणि दूध डेअरी येथे दोन्ही वेगवेगळे प्रकल्प होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे घाटीतही एमसीएच विंग होईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.क
स्वतंत्र माता व बालविभाग घाटी रुग्णालयात उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:26 PM
घाटी रुग्णालयात २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्यात यावा, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सोमवारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली. यावेळी घाटी आणि दूध डेअरीच्या जागेवर एमसीएच विंगचा स्वतंत्र प्रकल्प होईल, असे आरोग्यमंत्री म्हणाल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले.
ठळक मुद्देआरोग्यमंत्र्यांकडे मागणी : घाटी आणि दूध डेअरीच्या जागेवर स्वतंत्र प्रकल्प