शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

विधी विद्यापीठाच्या जागेवर तोडगा निघेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 7:30 PM

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाला (एमएनएलयू) आवश्यक असलेल्या जागेचा तोडगा काही निघेना. राज्य सरकारने करोडी येथे दिलेल्या ५० एकर जागेला पाणी उपलब्ध नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने नकार दिला.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाला (एमएनएलयू) आवश्यक असलेल्या जागेचा तोडगा काही निघेना. राज्य सरकारने करोडी येथे दिलेल्या ५० एकर जागेला पाणी उपलब्ध नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने नकार दिला. कांचनवाडी परिसरातील विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या ९ एकर जमिनीच्या लगतची ४१ एकर जमीन देण्यास ‘वाल्मी’ने तीव्र विरोध केला आहे. यामुळे विधि विद्यापीठ कांचनवाडीत होणार की करोडीत? हा संभ्रम कायम आहे.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या ‘कार्यकारी परिषदे’ची बैठक नुकतीच विद्यापीठात पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसह इतर इमारतीच्या तयार केलेल्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या बैठकीनंतर सोमवारी विद्यापीठाच्या जागेसंदर्भात राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव व उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला महसूल, सार्वजनिक बांधकाम, वाल्मी, उच्चशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश, कुलसचिव डॉ. व्ही. आर. सी. कृष्णैय्य आदी उपस्थित होते. या बैठकीत वाल्मी संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी निधी गजबे यांनी विधि विद्यापीठाला संस्थेची ४१ एकर जागा देण्यास तीव्र विरोध दर्शविला. वाल्मीकडे असलेली जमीन संस्थेलाच कमी पडत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचा पवित्रा घेतला. राज्य सरकारकडे कांचनवाडी परिसरात केवळ ९ एकर एवढीच जागा उपलब्ध आहे. ती जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने विधि विद्यापीठाकडे हस्तांतरित केली. मात्र विधि विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार किमान ५० एकर जागा असणे आवश्यक आहे. 

यावर सीताराम कुंटे यांनी भांगसीगड माता परिसरातील करोडी येथे राज्य सरकारने दिलेल्या ५० एकर जागेचा विधि विद्यापीठाने पुन्हा विचार करावा. करोडी येथे पाणी उपलब्ध करण्यासाठीचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे द्यावा किंवा कांचनवाडी परिसरातील ९ एकर जागेतच विद्यापीठ उभारावे, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाला केली आहे. यामुळे विधि विद्यापीठ कांचनवाडी परिसरात होणार की करोडी? हा संभ्रम कायम आहे. याविषयी कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर कुलसचिव डॉ. व्ही. आर. सी. कृष्णैय्य यांनी बोलण्यास नकार दिला. कुलगुरू भोपाळ दौऱ्यावर असून, शुक्रवारी औरंगाबादेत परतण्याची शक्यता आहे.

इमारतीच्या आराखड्यास मंजुरी विधि विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसह तासिकांसाठीच्या इमारती, ग्रंथालय, सभागृहे, विद्यार्थी वसतिगृह, विद्यार्थिनी वसतिगृहांच्या प्रशस्त आराखड्यास विद्यापीठाच्या ‘कार्यकारी परिषदे’ने मान्यता दिली. यानुसार एकूण २२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा असून, तब्बल ३.५० लाख चौरस मीटर बांधकाम असणार आहे.विधि विद्यापीठाचा बांधकाम आराखडा अतिशय उत्तम असून, कार्यकारी परिषदेसह उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी या आराखड्याची स्तुती केली आहे. भव्य दिव्य इमारती, ग्रंथालये, सुसज्ज रस्ते, विद्यार्थी सुविधा, कॅन्टीन,  वसतिगृहे, प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन, वित्त व लेखा इमारत, अशा विविध इमारतींची तरतूद या आराखड्यात केलेली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संस्थेचा तीव्र विरोधविधि विद्यापीठाने वाल्मी संस्थेच्या ताब्यातील ४१ एकर जमीन मागितली होती. मात्र, वाल्मी संस्थेकडे असलेली जमीन संस्थेलाच कमी पडत आहे. यात अशा पद्धतीने जमीन दुसऱ्या संस्थांना दिल्यास वाल्मीचे काय होणार? हा प्रश्न निर्माण होतो. यामुळे वाल्मीची जमीन विधि विद्यापीठाला देण्यास संस्थेचा तीव्र विरोध आहे. हा विरोध मंत्रालयातील बैठकीतही स्पष्टपणे दर्शविला आहे.- निधी गजबे, प्रशासकीय अधिकारी, वाल्मी

टॅग्स :Maharashtra National Law University, Aurangabadराष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबादState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना