शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

तीन अपघातांत सात ठार

By admin | Published: September 10, 2015 12:10 AM

बीड : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात सातज् ाण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बीड : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात सातज् ाण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास औरंगाबादला दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना गेवराई तालुक्यातील चकलंबानजीक घडली. ठाण्याहून तलवाडयाकडे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी कारने येत असताना गेवराई तालुक्यातील चकलांबा फाट्याजवळील पुलावरून खड्डे चुकविण्याच्या नादात ती कार खाली कोसळली. या अपघातात एका पुरूषासह दोन महिला जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे ९ सप्टेंबर रोजी दहाव्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास जाण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ठाणेहुन एमएच ४८ पी- ५१३८ या कारने तलवाडा कडे जात येत होते. गेवराई तालुक्यातील महारटाकळी ( चकलांबा फाट्या ) रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात लेंडी नदीवरून जात असताना सदरील कार या नदीत कोसळली. या अपघातात शेख इक्बाल शेख हबीब ( वय ३५) ,शेख हासिनाबी शेख चाँद ( वय ५५ ), जिकया बेगम शेख शबीर ( वय ४०) हे तिघे जागीच ठार झाले तर शब्बीर शेख ( वय ४५), सिराज शेख हबीब ( वय ४०) मजु शेख ( वय ७ ) हे जखमी झाले आहेत. हे सर्व गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील असून ते सध्या वसई ठाणे जिल्ह्यात वसई येथे हल्ली राहत होते. हा अपघात राञी एक वाजता घडल्यानंतर कार नदीच्या पात्रात कोसळल्याने जखमीचा आवाज रस्त्यावर फारसा येऊ शकला नाही त्यामुळे जखमीनी गेवराई येथील नातेवाईकांना फोन करून माहिती दिली . त्यानंतर नातेवाईकांनी जावून मदत केली. तब्बल तीन तासानंतर जखमींना उपचार मिळाले. पहाटे चार वाजता गेवराई येथील उपजिल्हा रु ग्णालयात या जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अपघातात मृत्यू झालेले मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बुधवारी सकाळी शवविच्छेदन केल्या नंतर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांवर गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे दफनविधी करण्यात आला. या घटनेचा पंचनामा पोलीस कॉन्स्टेबल मोरे डि. वाय , पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद एस . पी , पोलीस नाईक पी. टी. मंजुळे यांनी केला. दुसरी घटना केज तालुक्यातील कोरेगाव येथे घडली. उत्तरेश्वर लहु तांदळे (वय२२) व आण्णासाहेब सुधाकर तांदळे (वय २०) अश मयतांची नावे आहेत. कोरेगाव येथील उत्तरेश्वर तांदळे व आण्णासाहेब तांदळे यांनी पुणे येथे टमटम रिक्षा (एमएच-२३ एडी-१४४९) खरेदी केला. तो रिक्षा गावाकडे घेऊन येत असताना लातुरहून नगरकडे जाणाऱ्या कार (क्र.एमएच-१७ व्ही-१३८९) ने त्यांच्या रिक्षाला समोरुन धडक दिली. त्यामुळे टमटमने दोन ते तीन वेळा पलटी घेतली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. सपोनि आर.जी. गाडेवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचानामा केला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी १ च्या सुमारास कोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सपोनि आर.जी. गाडेवाड करीत आहेत. तिसरी घटना बीड तालुक्यातील कोळगाव जवळ बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सातेफळ येथील जीप बीड तालुक्यातील कोळगाव येथून जात होती. त्यावेळी जीप चालकाने समोर असणाऱ्या बस (क्र. एमएच-२० बीएल-२३५२) ला ओव्हरटेक केले. त्यावेळी बाजुला एक टेम्पो (क्र. एमएच-२३ बीएल-३६३) होती. टेम्पोलाही जीप ओव्हरटेक करत असताना समोरुन वेगात एक कंटनेर आला व त्याने जीपसह टेम्पोला जोराची धडक दिली. त्यामुळे मागे असणाऱ्या बसलाही धडक बसली. या अपघातात जीपचा चक्काचुर झाला. त्यातील चार पैकी दोघे जागेवरच ठार झाले. तर टेम्पो ड्रायव्हर जखमी झाला. बसमधील प्रवासी जखमी झाले नसल्याचे समजते. शितलकुमार शिनगारे (वय ४५) व जयराम सिताराम वाघमारे (वय ३०) अशी अपघातात मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर जमखी व्यक्तींमध्ये संतोष प्रभाकर उगले, दिपक साळवे, अस्लम इनामदार, अल्फीया इनामदार, बळीराम जगदाळे व बाबु भगवान येडे यांचा समावेश आहे. येडे यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे.