शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

देशभरातील छावणी परिसराच्या कायापालटासाठी सात सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 7:11 PM

देशातील छावणी परिसराच्या कायापालटासाठी केंद्र शासनाने (संरक्षण मंत्रालयाने) पुढाकार घेऊन सात सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित केली आहे. 

- प्रभुदास पाटोळे 

औरंगाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातील ६२ छावणी परिषदांमधील नागरी परिसर स्थानिक शहरांच्या मध्यवस्तीत असूनही जाचक अटी आणि नियमांमुळे खेड्यापेक्षाही वाईट अवस्थेत आहे. देशातील छावणी परिसराच्या कायापालटासाठी केंद्र शासनाने (संरक्षण मंत्रालयाने) पुढाकार घेऊन सात सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित केली आहे. 

ही समिती औरंगाबादसह देशातील सर्व छावणी परिषदांना प्रत्यक्ष भेटी देऊन, स्थानिक मुख्य कार्यकारी अधिकारी, लोक प्रतिनिधी (सदस्य) आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि सूचना ऐकून घेणार आहे. शिवाय छावणी परिषद कायद्याचा अभ्यास करून सद्य:स्थितीशी सुसंगत अशा सुधारणा आणि दुरुस्त्याही ही समिती सुचविणार आहे. समिती चार महिन्यांत अहवाल सादर करणार आहे. 

तज्ज्ञ समिती     संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार १७ सप्टेंबर २०१८ रोजी निवृत्त महसूल सचिव सुमित बोस (आयएएस) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. सदस्य म्हणून संरक्षण मंत्रालयाचे माजी सचिव टी.के. विश्वनाथन, माजी लेफ्टनंट जनरल अमित शर्मा (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम), संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव जयंत सिन्हा, संरक्षण मंत्रालयाच्या लेखा विभागाच्या प्रधान नियंत्रक देविका रघुवंशी (आयडीएएस) आणि जाधवपूर विद्यापीठातील वास्तुविशारदशास्त्र विभागामधील प्राध्यापिका डॉ. मधुमिता रॉय तसेच सदस्य सचिव म्हणून सैन्य संपदा विभागातील अतिरिक्त महा निदेशक राकेश मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

छावणी परिसराची सद्य:स्थितीसध्या छावणीतील नागरी परिसरातील संपूर्ण जमीन संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची असून केवळ त्यावरील बांधकाम (स्ट्रक्चर) संबंधिताच्या मालकीचे आहे. येथील मोजकीच बांधकामे मालकीची (फ्री होल्ड) असून, उर्वरित सदर बांधकामे भाडेतत्त्वावर (लीज होल्ड) आहेत. केवळ तळमजल्याच्याच बांधकामाला परवानगी आहे. मालमत्तांची विक्री आणि हस्तांतरणाचे नियम जाचक आहेत. छावणी परिसरातील बंगल्यांचे मालक आणि शेतकऱ्यांच्या मालकीहक्कांवरून वाद आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छावणी परिषद ही केंद्र शासन संचलित स्थानिक स्वराज्य संस्था आहे. असे असताना देशातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना (सदस्यांना) असलेले कोणतेही अधिकारी छावणी परिषदेच्या सदस्यांना नाहीत. त्यासाठी सदस्यांचा केंद्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. देशातील इतर भागांना मिळणारे राज्य आणि केंद्र शासनाचे विविध निधी आणि योजनांचा लाभही छावणी परिसराला मिळत नाहीत. परिणामी, या भागाचा विकास खुंटला असून, येथील नागरिक शहरातील इतर भागात स्थलांतरित होत आहेत. मात्र, तज्ज्ञ समिती या सर्व बाबींचा आढावा घेणार असल्यामुळे ही परिस्थिती सुधारण्याचा आशेचा किरण दिसत आहे, अशी नागरिकांची भावना आहे. 

समिती खालील बाबींचा घेणार आढावाही तज्ज्ञ समिती छावणी परिषद कायद्याचा अभ्यास करून छावणी परिसरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, नागरिकांचे संरक्षण, स्वच्छता तसेच मालमत्तांशी संबंधित बांधकामांचे नियम, एफएसआय, मालमत्तांची विक्री आणि हस्तांतरण, मालमत्ता भाडे तत्त्वावर देणे, कालबाह्य झालेल्या ‘ओल्ड ग्रँट’ (एक्सपायर्ड) बंगले व इतर मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण, मुदत संपत आलेल्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण, रेन वॉटर हार्व्हेस्टिंग, आगीपासून संरक्षण, आपत्ती निवारण आदी बाबींचा आढावा घेणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकारDefenceसंरक्षण विभाग