शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास ७ वर्षे सक्तमजुरी

By admin | Published: July 15, 2015 12:32 AM

औरंगाबाद : मावशीचा गुरुभाऊ असलेला विकास रमेश राजपूत याने सुरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व नंतर अपहरण करून वर्षभर बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध

औरंगाबाद : मावशीचा गुरुभाऊ असलेला विकास रमेश राजपूत याने सुरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व नंतर अपहरण करून वर्षभर बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस. शिंदे यांनी त्याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पतीला त्याच्या पत्नीने मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने तिलादेखील न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुरेवाडी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मावशीचा गुरुभाऊ विकास राजपूत याने १७ जुलै २०१२ रोजी घरात घुसून बलात्कार केला. आई, भाऊ व वडिलास जिवे मारण्याची धमकी देत तिला गप्प केले. धमकी देत त्यानंतर वर्षभर तो तिच्यावर सतत अत्याचार करत होता. एक दिवस विकासने तिला संभाजीपेठेतील त्याच्या घरी सोन्याचा ऐवज घेऊन बोलावले. न आल्यास मी काय करू शकतो हे तुला माहीत आहे, असेही धमकावले. धास्तावलेल्या मुलीने घरातून सुवर्णालंकार घेऊन पळ काढला आणि विकासच्या दुचाकीवर बसून ती त्याच्या घरी गेली. रात्रभर जटवाडा येथील विकासच्या घरात ती थांबली. २७ जून २०१२ रोजी पहाटे विकासने त्याची पत्नी कल्पनासोबत तिला मध्य प्रदेशातील सोनतलाव येथे पाठविले. दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात नोंदविली. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तपास अधिकारी तडवी यांना राजपूत याने मुलीस पळवून नेल्याची माहिती मिळाली. तडवी यांनी याचा माग काढत शिरपूर येथून विकास त्याची पत्नी कल्पना व मुलीला ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस. शिंदे यांच्यासमोर झाली. अतिरिक्त लोकअभियोक्ता कैलास पवार यांनी सहा साक्षीदार तपासले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विकासचा मामा व तरुणी हे दोघे फितूर झाले होते. असे असतानाही पुराव्याआधारे मुलीचे अपहरण केल्याचे सिद्ध झाले. विकासला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद आणि त्याला मदत करणारी त्याची पत्नी कल्पनाला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद सुनावली. मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विकासला ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. दंडापोटी जमा होणाऱ्या रकमेतून सदर मुलीला २० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.