लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर मागील आठ महिन्यांमध्ये केवळ शेडचे काम पूर्ण झाले आहे; परंतु प्रतीक्षालयाचा विस्तार, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची कामे अद्यापही अर्धवटच आहेत. ही कामे एप्रिलअखेर पूर्ण होणार होती; परंतु अद्यापही ती सुरूच आहेत.मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनचा ‘डी’ दर्जाच्या स्टेशनमध्ये समावेश करण्यात आला, त्यामुळे ‘डी’ वर्गातील स्टेशनवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेने ६० लाखांचा निधी मंजूर केला. यातून या ठिकाणच्या प्रतीक्षालयाचा विस्तार, पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृह आणि शेड उभारणीचे काम हाती घेण्यात आले. ही विकासकामे एप्रिलअखेर पूर्ण होतील, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अधिकारी म्हणाले होते; परंतु मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या कामांत या ठिकाणी केवळ शेडची उभारणी झाली आहे. उर्वरित कामे अद्यापही संथगतीने सुरू असल्याचे दिसते.
आठ महिन्यांमध्ये फक्त शेडचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:52 AM