शंकरनगर: विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडतानाच जीवनाचे ध्येय निश्चित करावे, ध्येयप्राप्तीसाठी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ़डी़एम़तंंगलवाड यांनी केले़डॉ़हेमंत बक्षी, डॉ़निवृत्ती भागवत, प्रा़रवींद्र जाधव, प्रा़डॉ़दयानंद माने, प्रा़जी़व्ही़पांचाळ, डॉ़शंकर लेखने यांनी फिश पाँड (शेला पागोटे) वाचन केले़ स्रेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगाच्या प्रारंभी स्रेहसंमेलनानिमित्त आयोजित सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले़ व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या संघातील लक्ष्मीकांत कांबळे, रामदास उपासे, संगमेश्वर बलशेटवार, राम टेकाळे, शिवकुमार पवार, महादेव नरवाडे, सुनील देगलुरे, शिवप्रसाद बामणे, सचिन जोमेगावे, बालाजी हाळे, दीपक वडजे, अतुल बसवदे यांचा कबड्डी स्पर्धेतील योगेश पिल्लनवाड, शेख खुदबोद्दीन, हणमंत रेड्डी, कपिल वाघमारे, सचिन गोदनगावे, देवानंद वाघमारे, जगदीश वाधमारे यांना पारितोषिक देण्यात आले़ सांस्कृतिक कार्यक्रमातील काव्यवाचन स्पर्धेत प्रथम परमेश्वर वानोळे, द्वितीय तुकाई बिजूरकर, तृतीय किरण कोरे़ गीतगायन- प्रथम किरण कोरे, द्वितीय उषा पुयड, तृतीय-प्रदीप सोनकांबळे़ वक्तृत्व स्पर्धा-प्रथम- परमेश्वर वानोळे, द्वितीय-ज्ञानेश्वर जाधव, तृतीय-भानुदास भोसले़ वादविवाद स्पर्धा- प्रथम-किरण कोरे, द्वितीय-शेख नजीर, तृतीय-ज्ञानेश्वर मठपती या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आले़यानंतर विद्यार्थी परिषदेचे सचिव योगेश्वर पिल्लनवाड यांनी अहवाल वाचन केले़ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यार्थी परिषदेचे स्थानिक अध्यक्ष डॉ़ वि़ मु़ रत्नाळीकर यांनी महाविद्यालयाने केलेल्या विकास कार्याचा संक्षिप्त आढावा सादर केला़डॉ़ डी़ एम़ तंगलवाड यांनी शेर, शायरीसह कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली़ अध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव मधुकरराव पाटील खतगावकर यांनी केला़ यावेळी प्रा़ रवींद्र जाधव, प्रा़जी़व्ही़पांचाळ, योगेश पिल्लनवाड, डॉ़निवृत्ती भागवत, प्रा़शिवाजी पाटोदे, डॉ़संभाजी कबाडी, डॉ़ हेमंत बक्षीस, डॉ़शंकर लेखने, डॉ़ शरदचंद्र देगलूरकर, डॉ़सुरेश धनवडे, डॉ़बी़पी़ जाधव, प्रा़पांडुरंग पांचाळ, प्रा़पी़एम़भुमरे, डॉ़अशोक सोनकांबळे, डॉ़दिलीप जामकर, डॉ़ दयानंद माने, डॉ़आऱडी़शिंदे, प्रा़विष्णू खेडकर, डॉ़सुधाकर टेळके, डॉ़ नीता ढेकळे, प्रा़जीवन चव्हाण, नारायण भुसावळे, गणपत धानेकर, पत्रकार हणमंत वाडेकर, मनोहर मोरे, अशोक पाटील, शेषराव कंधारे, यशवंत मोरे, भास्कर भेदेकर, विद्यार्थी प्रतिनिधी, पालक माधवराव इबितवार, मु़अ़अनिल गायकांबळे उपस्थित होते़ सूत्रसंचालन प्रा़ गोविंदराव पांचाळ यांनी केले़ माधुरी शिंदे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)
शंकरनगर महाविद्यालयात स्रेहसंमेलन रंगले
By admin | Published: March 01, 2016 11:40 PM