औरंगाबाद : वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे आज दुपारी उघडकीस आले. या प्रकरणी नाशिक येथील नितीन गणेश मोरे या इसमाविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी कि, वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना आज दुपारी आशामाच्या पत्यावर नाशिक येथून एक पत्र आले. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याल आल्याचे उघडकीस झाले. हे पत्र नितीन गणेश मोरे याने पाठविल्याचा पत्रावर उल्लेख आहे. यामुळे आश्रमात एकच खळबळ उडाली. हे पत्र नितीन गणेश मोरे रा. नाशिक यानंतर जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गणपत आसाराम म्हस्के यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात नितीन मोरे याच्या विरोधात तक्रार दिली. यावरून मोरे विरोधात कलम 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरिक्षक हरीष खेडकर करत आहेत.