मध्यप्रदेश बिलासपूर येथील सुनील कुमार पत्नी व दहा वर्षांच्या मुलीसह करंजखेड गावात आले. ते गावोगावी जाऊन दोरीवरचे खेळ करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या या कामात आता त्यांची दहा वर्षांची मुलगी सोना हीदेखील मदत करू लागली आहे. जिवाची पर्वा न करता अंगमेहनतीने मोठ्या शिताफीने ती दोरीवरच्या कसरती करते. दोरीवर चालणे, दोरीवर झोका खेळणे, डोक्यावर ताटली ठेवून दोरीवर चालणे, दोरीवरून सायकल चालविणे अशाप्रकारचे सादरीकरण करून ती उपस्थितांचे मन जिंकून घेते, तर तिच्या कसरतीचे दर्शन घडवून देते. जमलेल्या गावकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली होती, तर ती चिमुरडी प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकत होती. तिच्या या मेहनतीला गावकऱ्यांनी बक्षीस दिले.
फोटो : करंजखेड गावात दोरीवरच्या कसरती करताना दहावर्षीय सोना.