शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

शिंदे सरकारचा दणका! सरकार बदलले, औरंगाबादसाठीचे ५०० कोटी थांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 12:07 PM

नियोजन विभागाचे अनुदानास स्थगिती, फेरआढावा घेण्याच्या आदेश 

औरंगाबाद: राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडताच शिंदे सरकारचा पहिला दणका नियोजन विभागाने मंजूर केलेल्या अनुदानाला बसला आहे. शासनाने ४ जुलै रोजी सायंकाळी परिपत्रक काढून प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा नियमित ३२५ कोटींचा व सुधारित १७५ कोटी मिळून मान्यता दिलेला ५०० कोटींच्या आराखड्यातील प्रशासकीय मान्यता दिलेली व निधीसाठी शिफारस केलेली कामे सध्या थांबली आहेत. नव्याने आलेले सरकार ५०० कोटींच्या अनुदानात कपात करणार असल्याचीही चर्चा आहे.

पालकमंत्र्यांसह नियोजन समितीच्या नियुक्त्या नजीकच्या काळात होणार आहेत. नियोजन समितीवर नवीन सदस्य व विशेष निमंत्रितांची नेमणूक होणार असल्याने १ एप्रिलपासून आजवर दिलेल्या विविध योजनेअंतर्गत कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या समोर सर्व कामांची यादी सादर करून ती कामे सुरू ठेवायची की थांबवायची याचा निर्णय होईल, असे नियोजन विभागाने पत्रात म्हटले आहे.

फेब्रुवारीत दिली होती मान्यतामराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने फेब्रुवारी महिन्यात ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याची तरतूद केली होती. त्याला आता कात्री लागणार आहे. राजधानीचे ठिकाण म्हणून जिल्ह्याला ५०० कोटींची तरतूद माजी अर्थमंत्र्यांकडे केल्यानंतर वित्त व नियोजन विभागाकडे ३ जानेवारी २०२२ रोजी मागणी केली होती. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत ३२५ कोटींच्या मर्यादेत माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने ५०० कोटी रुपयांचा १८४ कोटी रुपयांच्या वाढीव मागणीसह प्रारूप आराखडा सादर केला होता.

३ कोटी १९ लाखांची कामे सध्या थांबली३ कोटी १९ लाख ९ हजार रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. त्या आता थांबल्या आहेत. त्यात नावीन्यपूर्ण योजनेसाठी ९ लाख ७६ हजार, वैजापूर तालुक्यात कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी २ कोटी ८४ लाख, अपारंपरिक ऊर्जासाठी १० लाख, २४ लाख २७ हजार कन्नड, पैठण, औरंगाबादमध्ये ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे आजपासून थांबली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEknath Shindeएकनाथ शिंदेfundsनिधी