लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा सुरू आहे. तर दुसरीकडे शिर्डी विमानतळाला विमान कंपन्यांचे प्राधान्य वाढत आहे. मुंबई, हैदराबादनंतर आता शिर्डीला १५ फेब्रुवारीपासून थेट गुजरातची हवाई कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. औरंगाबादकरांना मात्र नव्या विमानसेवेसाठी आकाशाकडे डोळे लावून बसावे लागत आहे.१ आॅक्टोबर रोजी शिर्डी विमानतळाचे उद््घाटन झाले. अवघ्या तीन महिन्यांनी या विमानतळावर तिसºया विमानसेवेची भर पडणार आहे. शिर्डी आणि गुजरातदरम्यान हवाई सेवा सुरूकरण्यात येणार आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून व्हेच्युरा एअरलाईन्स ही कंपनी सुरुवातीला ९ सीटर चार्टर विमानाद्वारे दररोज ही सेवा देणार आहे. सुरतहून शिर्डीसाठी बुधवारी चार्टर विमानाने चाचणी घेण्यात आली आहे. दररोज हे विमान सकाळी १० वाजता शिर्डीला येऊन पुन्हा १२ वाजता परतणार आहे. यानंतर १९ आसनी सेवा सुरू करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे.शिर्डी विमानतळाच्या लोकार्पणप्रसंगी दहा विमान कंपन्या शिर्डीतून सेवा देण्यास इच्छुक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. शिर्डीसाठी प्रारंभी मुंबई आणि हैदराबाद येथून विमानसेवा सुरू झाली. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता विमानसेवा देणाºया इतर कंपन्यांनीही पुढाकार घ्यावयास सुरुवात केली आहे. दुसरीकडे औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजघडीला एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन विमान कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी जोडले आहे. चिकलठाणा विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे. त्यास विमान कंपन्यांबरोबर राज्य आणि केंद्र शासनाचे पाठबळ मिळण्याची गरज आहे.कंपन्यांकडे पाठपुरावा४विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. कंपन्यांकडे सध्या मोठी विमाने उपलब्ध नाहीत. कंपन्यांना ही विमाने प्राप्त होताच आपल्या येथून नवीन विमानसेवा सुरू होईल. शिर्डीला छोट्या विमानांची सेवा सुरू होत आहे.-डी. जी. साळवे, संचालक,चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ
शिर्डीला प्राधान्य; औरंगाबादची उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:13 AM
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा सुरू आहे. तर दुसरीकडे शिर्डी विमानतळाला विमान कंपन्यांचे प्राधान्य वाढत आहे. मुंबई, हैदराबादनंतर आता शिर्डीला १५ फेब्रुवारीपासून थेट गुजरातची हवाई कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. औरंगाबादकरांना मात्र नव्या विमानसेवेसाठी आकाशाकडे डोळे लावून बसावे लागत आहे.
ठळक मुद्देविमानसेवा : मुंबई, हैदराबादनंतर आता शिर्डीला गुजरातची हवाई कनेक्टिव्हिटी