औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यांची सुरुवात औरंगाबाद येथून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी २६ जून रोजी होणार आहे. हा मेळावा यशस्वी होऊ नये, यासाठी सरकारमधील काही गावगुंड प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास शिवसंग्रामचे प्रमुख आ. विनयाक मेटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजात प्रचंड संतापाची लाट आहे. मेळाव्याच्या माध्यमातून या संतापाला वाट करून देण्याचा प्रयत्न शिवसंग्रामच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र, सरकारमध्ये असलेल्या पक्षाचे काही गावंगुड मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आ. मेटे यांनी केला. या दबावाला झुगारून शिवसंग्रामचा मराठा आरक्षण मेळावा यशस्वी होणार असल्याचा दावाही आ. मेटे यांनी यावेळी केला.