शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शिवसेनाही लागली लोकसभेच्या तयारीस; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात मेळावा

By बापू सोळुंके | Published: December 28, 2023 7:00 PM

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीची तयारीसाठी शिवसेना शिंदे गटही सक्रीय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेचा मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री शिंदे फोडणार आहेत.

शिवसेनेला मुंबईनंतर मराठवाड्यातील जनतेने सर्वाधिक प्रेम दिले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गतपंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले होते. यात शिवसेनेच्या सहा आमदारांचा समावेश आहे. त्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जिल्ह्यातील पाच आमदार आहेत. 

यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. यात शिवसेनेनेही मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विधानसभा मतदार संघानिहाय पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला होता. गतपंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातून निसटलेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नाव यात आघाडीवर आहे. यापार्श्वभूमीवर अवघ्या काही महिन्यांवर असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा ते घेणार आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभा