- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शहरात सध्या पाणीप्रश्न कमालीचा पेटला आहे. नळाला पाणीच येत नसेल, तर ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी तरी कशासाठी घेता, अशी ओरड सर्वसामान्यांकडून सुरू आहे. त्यामुळे पन्नास टक्के पाणीपट्टी कमी करण्याची मागणी राजकीय मंडळींकडून शासनाला करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, औरंगाबादकरांनी निवडून दिलेल्या ११५ नगरसेवकांनी २०११मध्ये दरवर्षी पाणीपट्टीत १० टक्के वाढ करण्याच्या ठरावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. या ठरावानुसार २०२२-२३मध्ये पाणीपट्टी ६ हजार ५०० रुपये वसूल करावी तर २०३२-३३मध्ये तब्बल १५ हजार ३०० रुपये पाणीपट्टी ठेवावी, असेही त्यात म्हटले आहे.
जायकवाडीहून औरंगाबाद शहरात मुबलक पाणी आणण्यासाठी महापालिकेतील तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या कारभाऱ्यांनी खासगी कंपनीला पाचारण केले होते. या कंपनीच्या हितासाठी अक्षरश: रेड कार्पेट अंथरून ठेवण्यात आले होते. त्याचे एक उदाहरण म्हणजे ७ सप्टेंबर २०११ रोजी सर्वसाधारण सभेत खास कंपनीसाठी पाणीपट्टी दरवाढीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. २० वर्षांसाठी ही दरवाढ असल्याचे ठरावात म्हटले आहे. हा ठराव मंजूर करताना पाणीपट्टी फक्त २,५०० रुपये होती. त्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ करावी, या ठरावानुसार मनपा प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली. पाणीपट्टी ४ हजार ५० रुपयांपर्यंत आल्यावर २०१७-१८ या आर्थिक वर्षात कंपनीची हकालपट्टी करण्यात आली.
एकीकडे कंपनीसाठी भरमसाठ पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतला होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. औरंगाबादकरांवर पाणीपट्टीचा बोजा वाढविणारेच आता पाणीपट्टी कमी करा, अशी मागणी करत आहेत. दुसरीकडे, पाणीपट्टी दरवाढीचे उपविधी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. शासनानेही त्याला मंजुरी दिली. आता हे उपविधी रद्द करायचे कसे, असा खल सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहे.
व्यावसायिक कनेक्शनधारकांचे मरणचव्यवसायिक नळ कनेक्शनधारकांना २०२२-२३मध्ये ३२ हजार ४५० रुपये पाणीपट्टीत वाढ करण्यास मुभा दिली होती. दरवर्षी १० टक्के वाढ म्हणजे २०३१-३२मध्ये ही दरवाढ ७६ हजार ४५० रुपये करण्याचे ठरावात म्हटले आहे.
निवासी पाणीपट्टी दरवाढ२०१८-१९ - ४,४५०२०१९-२० - ४,९००२०२०-२१ - ५,४००२०२१-२२ - ५,९००२०२२-२३ - ६,५००२०२३-२४ - ७,१५०२०२४-२५ - ७,८५०२०२५-२६ - ८,६५०२०२६-२७ - ९,५००२०२७-२८ - १०,४५०२०२८-२९ - ११,५००२०२९-३० - १२,६५०२०३०-३१ - १३,९००२०३१-३२ - १५,३००