शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

औरंगाबाद ‘मध्य’ मतदारसंघावरून सेना-भाजपा अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 7:39 PM

युतीचं ठरलंय? : जागावाटपात कुणाची बाजू वरचढ ठरणार याकडे लागले सर्वांचे लक्ष

ठळक मुद्देभाजपाला ‘मध्य’ मिळेल, अशी आशा इच्छुकांना आहे.माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचा मध्य मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुतीच्या सध्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. बैठकीत जागा वाटपासाठी आकडेमोडीचे फॉर्म्युले चर्चेत येत आहेत. जागावाटपात कुणाची बाजू वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक मतदारसंघांतील युतीच्या इच्छुकांमध्ये मात्र चलबिचल वाढली असून, औरंगाबाद शहरातील ‘मध्य’ मतदारसंघ त्यापैकी एक आहे. 

युती झाल्यास सदरील मतदारसंघ कुणाकडे जाणार यावरून इच्छुक दावेदारी करू लागले आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती तुटली. भाजपकडून किशनचंद तनवाणी, तर शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल मैदानात होते. दोघांमध्ये मतविभाजन झाल्याने एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे यावेळी युती झाली, तर ‘मध्य’ची जागा सेना किंवा भाजपाला सुटली, तर तुल्यबळ लढत होईल. 

युती तुटली तर पुन्हा चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. युतीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत मध्य मतदारसंघात मतदारांची संख्यादेखील वाढली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत ३ लाख १९ हजार ६४५ मतदारसंख्या होती. त्यामध्ये आणखी काही भर पडणार आहे. १ लाख ६५ हजार १५३ पुरुष, तर १ लाख ५४ हजार ४९४ महिला मतदार मतदासंघात आहेत. २०१४ च्या तुलनेत ८३ हजार ५६७ मतदार वाढले. त्यात आणखी भर पडणार आहे. वाढलेल्या मतदारसंख्येनुसारदेखील विजयाची गणिते बदलण्याची शक्यता आहे. 

२०१४ साली काय झाले होते निवडणुकीत२०१४ साली खा. इम्तियाज जलील यांना ६१ हजार ८४३ मते मिळाली होती. ३१ टक्के मतांचे ते प्रमाण होते. शिवसेनेचे उमेदवार जैस्वाल यांना ४१ हजार ८६१ मते मिळाली होती. २५ टक्के मतांचे ते प्रमाण होते. भाजपचे उमेदवार तनवाणी हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना ४० हजारांच्या आसपास मते होती. शिवसेनेत तनवाणी विरुद्ध जैस्वाल गट, अशी फूट पडल्याचा फटका जैस्वाल यांना बसला होता. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे युतीत जागावाटपात ‘मध्य’ची जागा शिवसेनेकडेच राहील, असा युक्तिवाद कार्यकर्ते, पदाधिकारी करीत आहेत, तर मतदारसंघाच्या अदला-बदलीत भाजपाला ‘मध्य’ मिळेल, अशी आशा इच्छुकांना आहे.

अशी आहे दावेदारीमाजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी मध्य मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्या मतदारसंघातून शिवसेनाच उमेदवार देईल, असे सोशल मीडियातून मध्यंतरी जाहीर केले, तर भाजपाचे प्रबळ दावेदार असलेले किशनचंद तनवाणी यांनी मतदारसंघ युतीमध्ये कुणाला सोडायचा, याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. ‘मध्य’मधील दावेदारांचा सगळा खेळ युती होण्यावर आणि जागा कोणत्या पक्षाला सुटते, यावर अवलंबून आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा