शिवना : लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वपूर्ण पाया असणाऱ्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी राजकीय पक्षही धडपड करू लागले आहेत. चाणाक्ष ग्रामीण मतदारांनी मात्र पक्षापेक्षा उमेदवारांचे कर्तृत्व पाहत आपला कौल दिला आहे. शिवना निवडणुकीच्या निकालावरून हे अगदी स्पष्ट झाले आहे.
ज्येष्ठांपेक्षा युवावर्गावर मतदारांनी अधिक विश्वास दाखविल्याने, विजयी उमेदवारांमध्ये युवावर्गाचे प्रमाण अधिक आहे. एकूण सतरा सदस्यांपैकी शिवशाही ग्रामविकास पॉनलला ११, संत धोंडीबा ग्रामविकास पॉनलला (बिजेपी) ६ जागेवर विजय मिळविला. शिवशाहीचे विजयी उमेदवारात विनायक काटकर, साकीया बेगम मोहम्मद, शामराव काटे, सुनिता राऊत, गणेश सपकाळ, जयश्री नेमाडे, फहिमीदाबी कुरैशी, जिजाबाई जगताप, खाजुमिया शेख, फरजाना शेख, मोहम्मद फरजीन यांचा विजय झाला, तर संत धोंडीबा विकासचे काळे मधुकर, काळे शोभाबाई, दहीतकर किरण, वाघ कौशल्याबाई, काळे अरुन, कुरैशी अजीम मंहमंद यांचा विजय झाला आहे. माजी सरपंच ईस्माइल कुरैशी हे वीस वर्षांपासून सदस्य आहेत. मात्र, यंदा पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेले तरुण उमेदवार मोहम्मद कुरेशी यांनी १०३ मतांनी पराभूत केले. शिवन्यासह पंचक्रोशीत घराघरात वृत्तपत्र पोहोचविणाऱ्या खुपटा येथील संतोष रघुनाथ काळे या वृत्तपत्र विक्रेत्याचा विजय झाला.