औरंगाबाद : शिवसेना नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खैरे यांनी स्वतः सोशल मिडीयावर ही माहिती शेअर केली.
चंद्रकांत खैरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले, ''माझी आज कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून खाजगी रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल''. खैरे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समृद्धी महामार्ग पाहणी दौऱ्यात सहभागी होते.
माझी आज कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. माझी प्रकृती ठीक...
Posted by Chandrakant Khaire MP on Wednesday, 9 December 2020