शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिकांचे जोडेमारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 11:58 AM

Shiv Sena's agitation against Narayan Rane : शहरातील बीजेपी कार्यालासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  

ठळक मुद्देहातात कोंबडी घेत नारायण राणेंच्या फोटोला मारले जोडेनारायण राणेंच्या विरोधातील घोषणांनी क्रांतिचौक दणाणला

औरंगाबाद : केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांचे मुख्यमंत्र्यांच्या ( CM Uddhav Thakarey ) संदर्भातील व्यक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नारायण राणेंच्या विरोधात क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे (Ambadas Danave ) यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. यानंतर शिवसैनिकांनी क्रांती चौकात नारायण राणेंच्या प्रतिमेला 'जोडोमारो' आंदोलन केले. ( Shiv Sena's 'Chappal Maro' agitation against Narayan Rane in Aurangabad )

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत सोमवारी आक्षेर्पाह वक्तव्य केले. त्या विरोधात शिवसेनेने मंगळवारी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात राणे विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर क्रांतिचौकात घोषणाबाजी करीत राणे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. कोंबडी चोर राणे अशा घोषणा देत हातात कोंबडी घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.दानवे म्हणाले, राणे यांना शिवसेनेवर गरळ ओखण्याविना दुसरे काम नाही. त्यांना दुसरे काम नाही, म्हणून त्यांनी सगळे सोडून कोंबडी चोरण्याचा व्यवसाय करावा. त्यामुळे कोंबडी आम्ही आंदोलनातून उपल्बध करून देत आहोत. शिवसेना काय आहे हे राणे यांना माहिती आहे. बांद्रा, कणकवली येथे त्यांना पराभवाची धूळ चारली आहे, ती शिवसेनेने. मुख्यमंत्री बाबत बोलताना प्रोटोकॉल पाळला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. राणे जशास तसे उत्तर देणार असे बोलत आहेत. त्यापूर्वी आम्हीच त्यांना उत्तर देऊ, असे दानवे यांनी स्पष्ट केले. या निषेध आंदोलनात माजी सभापती राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे आदींचा सहभाग होता. दरम्यान, शहरातील बीजेपी कार्यालासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाagitationआंदोलनAurangabadऔरंगाबाद