शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

औरंगाबादेत पोलिसांनी रोखला शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:01 AM

जमावबंदी असतांना आणि पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना पैठणगेट येथे हिंदू शक्ती मोर्चानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांचा आलेला हजारोंचा जमाव पोलिसांनी कडक बंदोबस्तात नियंत्रणात घेतला. ५०० मीटरच्या अंतरात चोहोबाजूंनी नाकाबंदी करीत मोर्चेकऱ्यांना सरस्वती भुवनच्या मैदानावर पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले. तेथे झालेल्या सभेत आयोजकांनी एमआयएम आणि भाजपचे नाव घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करणारी भाषणे केली.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडले : सभेत एमआयएम, भाजपवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जमावबंदी असतांना आणि पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना पैठणगेट येथे हिंदू शक्ती मोर्चानिमित्तशिवसेना कार्यकर्त्यांचा आलेला हजारोंचा जमाव पोलिसांनी कडक बंदोबस्तात नियंत्रणात घेतला. ५०० मीटरच्या अंतरात चोहोबाजूंनी नाकाबंदी करीत मोर्चेकऱ्यांना सरस्वती भुवनच्या मैदानावर पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले. तेथे झालेल्या सभेत आयोजकांनी एमआयएम आणि भाजपचे नाव घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करणारी भाषणे केली.११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, कार्यकर्ता लच्छू पहिलवान आणि अन्य कार्यकर्त्यांची धरपकड केली. या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने हिंदू शक्ती मोर्चाचे शनिवारी आयोजन केले होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि संयोजकांना नोटिसा बजावल्या होत्या. असे असताना शिवसेनेने विनापरवाना पैठणगेट येथून मोर्चा काढला. पैठणगेट येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा होऊ लागले. याचवेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. साडेअकरा वाजेच्या सुमारास सुमारे अडीच हजार शिवसैनिक पैठणगेट परिसरात जमा झाले.मोर्चेकºयांकडून कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, नागनाथ कोडे, रामेश्वर थोरात, ज्ञानोबा मुंढे, रामचंद्र गायकवाड यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि अन्य अधिकारी, कर्मचारी मोर्चाच्या मार्गावर तैनात होते. सोबत राज्य राखीव दलाच्या (एसआरपी) सात कंपन्या, दंगा नियंत्रण पथक, क्यूआरटी, शहर पोलीस दलातील सुमारे एक हजार पोलीस, सुमारे १२५ पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलीस तैनात होते.नगरसेवक मतीनला अटकेची मागणीपोलीसांना त्या रात्री शिवसैनिक आणि हिंदू नागरिकांनी वाचविले. असे असतांना शिवसैनिकांचे अटकसत्र सुरू आहे. शनिवार सायंकाळपर्यंत एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यास पोलीसांनी अटक करावी, अशी मागणी सभेमध्ये करण्यात आली. रॉकेल आणि पेट्रोलचा पुरवठा मतीन यांच्याकडून झाल्याचा आरोप खा.खैरे यांनी केला.बॅरिकेडस् लावून अडविलेपैठणगेट येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार होता. विनापरवाना निघालेला मोर्चा पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे आणि अन्य अधिकारी, कर्मचाºयांनी टिळकपथवरील एका कापड दुकानासमोर बॅरिकेडस् लावून रोखला. यावेळी ढाकणे यांनी लाऊडस्पीकरवरून आवाहन करून मोर्चेकºयांना महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ६८ नुसार सूचना देऊन ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व मोर्चेकºयांना पोलिसांनी स. भु. महाविद्यालयाच्या मैदानावर नेले. तेथे कलम ६९ नुसार सर्व मोर्चेकºयांना सूचना देऊन सोडून देण्यात आले.स. भु. मैदानावर सभामोर्चेकºयांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे खा. खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जि.प.अध्यक्ष देवयानी डोणगांवकर, हिंदू आश्रम मुंबईचे आचार्य जितेंद्र महाराज, प्रकाश बोधले, नवनाथ महाराज आंधळे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, विकास जैन, राजू वैद्य, त्र्यंबक तुपे, संतोष माने आदींच्या उपस्थितीत एस.बी.च्या मैदानावर सभा झाली.पोलिसांनी सर्व आयुधे काढली बाहेर...मोर्चेकºयांकडून कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे स्वत: पैठणगेट येथील परिमंडळ- १ चे उपायुक्त कार्यालयात सकाळपासून ठाण मांडून होते. आयुक्तांनी सांगितले की, मोर्चाच्या निमित्ताने आज आमचा सराव झाला.पोलीस मुख्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाºयांसोबतच दंगा नियंत्रण पथक , वज्र आणि वरुण वाहन, गिअर प्रोटेक्टर, अग्निशमन दलाच्या गाड्या पैठणगेट, टिळकपथवर तैनात केले होते.पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ नुसार सूचना देऊन मोर्चेकºयांना ताब्यात घेतले आणि ६९ नुसार त्यांना सोडले.ताब्यातील मोर्चेकºयांना वाहनातून पोलीस ठाण्यात नेणे शक्य नव्हते. यामुळे त्यांना आम्ही स. भु. कॉलेजच्या मैदानावर नेले. सुमारे अडीच हजार लोकांचा यात समावेश होेता, असे पोलीस आयुक्त म्हणाले.

टॅग्स :Morchaमोर्चाAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस