शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

शिंदेसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांनी दुसऱ्यांदा कापली 'MIM'च्या पतंगाची दोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 12:32 IST

मध्य मतदारसंघ: ८ हजार ११९ मतांनी एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांचा पराभव

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी दुसऱ्यांदा एमआयएम पक्षाचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांचा ८ हजार ११९ मतांची दारूण पराभव केला. २०१९ मध्ये जैस्वाल यांनीच सिद्दीकी यांचा पराभव केला होता. २०१४ चा अपवादवगळता जैस्वाल यांनी २००९, २०१९ आणि २०२४ मध्ये विजयी गुलाल उधळला.

हिंदू मतांच्या विभाजनासाठी उद्धवसेनेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. याच ठिकाणी जैस्वाल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, निवडणूक प्रचारात उद्धवसेनेचे बाळासाहेब थोरात यांनी मुसंडी मारल्याने जैस्वाल आणि त्यांचे समर्थक विचलित झाले होते. मागील निवडणुकीपेक्षा तीन हजार अधिक मते घेत जैस्वाल यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या निकालात अनेक नाट्यमय घडामोडीही पाहायला मिळाल्या. सलग १४ व्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या जैस्वाल यांना १५ व्या फेरीत अचानक धक्का बसला. सिद्दीकी यांनी मुसंडी मारत ४ हजारांची लीड घेतली. हे मताधिक्य घटविण्यासाठी जैस्वाल यांना १९ व्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला. २० व्या फेरीत पुन्हा जैस्वाल यांनी २६०३ मतांची लीड घेतली. शेवटपर्यंत सिद्दीकी यांना ही लीड तोडता आली नाही. शेवटी २३ व्या फेरीत जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी निवडून आले. उद्धवसेनेचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना ३७ हजार ९८ मतांवर समाधान मानावे लागले. वंचितचे जावेद कुरैशी यांना १२ हजार ६३९ मते मिळाली.

८५,४५९: जैस्वाल यांना मिळालेली मते

प्रदीप जैस्वाल-उद्धवसेनाविजयाची तीन कारणे१- लाडकी बहिणी योजनेसह अडीच वर्षात मतदारसंघातील गुंठेवारी भागात केलेली विकासकामे कामाला आली.२- हिंदू मतांच्या विभाजनासाठी माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी घेतलेली माघार बरीच फायदेशीर ठरली.३- विविध समाजाचे भरभरून मतदान, निवडणुकीत जैस्वाल यांच्या मुलांनी केलेले नियोजन यशस्वी झाले.

नासेर सिद्दीकी यांच्या पराभवाची कारणे१- लोकसभेत इम्तियाज जलील यांनी ८५ हजार मते मिळाली होती तेवढी मते नासेर सिद्दीकी यांना मिळाली नाहीत.२- मतदानाच्या दिवशी मुस्लिम बहुल भागात मतदारांमध्ये उदासीनता, कुठेही मतदारांच्या रांगा नव्हत्या.३- एमआयएम पक्षातील बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकारी २४ तास पूर्वमध्ये काम करत होते.

‘मध्य’मध्ये उमेदवारांना मिळालेली मतेउमेदवार- पक्ष- मिळालेली मतेप्रदीप जैस्वाल - शिंदेसेना -८५,४५९नासेर सिद्दीकी - ‘एमआयएम’- ७७,३४०डाॅ. बाळासाहेब थोरात- उद्धवसेना - ३७,०९८मो. जावेद मो. इसाक- वंचित बहुजन आघाडी -१२,६३९सुहास दाशरथे- मनसे - ११४५विष्णू तुकाराम वाघमारे- बहुजन समाज पार्टी-८९६नदीम राणा- ऑल इंडिया मजलीस-ए-इकलाब-ए-मिल्लत- १८८नवाब अहेमद शेख- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी- १०२डाॅ. प्रमोद मोतीराम दुथडे - प्रहार जनशक्ती पार्टी- ११५०ॲड. बबनगीर उत्तमगीर गोसावी- हिंदुस्तान जनता पार्टी- ३८१मुजम्मिल खान नुरुल हसन खान- सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया - ३१८सचिन अशोक निकम- रिपब्लिकन सेना- ८०७सुनील भुजंगराव अवचरमल- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफाॅरमिस्ट)-१६७सुरेंद्र दिगंबर गजभारे- मराठवाडा मुक्ती मोर्चा- १५१संदीप जाधव- पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) - १६३अब्बास मैदू शेख- अपक्ष-३५६कांचन चंद्रकांत जांबोटी- अपक्ष- ३१४जयवंत (बंडू) ओक- अपक्ष- ५८४मोहम्मद युसूफ सज्जाद खान- अपक्ष- ४९३मंगेश रमेश कुमावत- १०३महंत विजय आचार्य जी- अपक्ष- १५१शकील इब्राहिम सय्यद- अपक्ष- ९२सुरेश गोविंदराव गायकवाड- अपक्ष-७३हिशाम उस्मानी- अपक्ष- ४६८वरीलपैकी कोणीही नाही (नोटा)- ९३८

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्य