खुलताबाद शहरातील मोठी आळी परिसरात छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सभापती गणेश आधाने, उपसभापती प्रकाश चव्हाण, नगरसेवक नवनाथ बारगळ, योगेश बारगळ, परसराम बारगळ, प्रकाश वाकळे, बाबासाहेब बारगळ, गटनेता नरेंद्रसिंग साळुंके, मनोहर लाळे, फकीरचंद काळे, पांडूरंग काळे, राजेंद्र बहादुरे, मुकेश मालोदे, दिनेश सावजी, गोरख बारगळ आदी उपस्थित होते. यावेळी विनोद पाटील मित्रमंडळाच्यावतीने महाराजांच्या पुतळा परिसरात हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
भद्रा मारूती मंदीर परिसरात संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरु पा. बारगळ, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे आदींनी छत्रपतींना अभिवादन केले. जायन्टस ग्रुपच्या वतीने राजेंद्र चव्हाण, अध्यक्ष जफरखान पठाण, सतीश कोळी, दिनेश सावजी, प्रा. संजय तुपे, संदेश केरे, गणेश दाभाडे आदींनी छत्रपतींना अभिवादन केले. कागजीपुरा ग्रामपंचायतीत छत्रपतींच्या प्रतिमेस सरपंच नाजरीन कुरैशी, उपसरपंच शेख अहेमद, ग्रामसेवक व्यंकटेश आदमवाड, शेख रिजवान आदींनी अभिवादन केले. इंदापुरातही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष अविराज निकम, राजू निकम, अशोक निकम, सुनील निकम, दत्तू निकम आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : खुलताबादेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन करतांना सभापती गणेश आधाने, उपसभापती प्रकाश चव्हाण आदी.
190221\7203626c08b84f07acf9dc55b1f1901a_1.jpg
खुलताबादेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन करतांना सभापती गणेश आधाने, उपसभापती प्रकाश चव्हाण आदी.