औरंगाबाद : सुधीरदादा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाºया ‘क्रीडा तपस्वी’ औरंगाबाद येथील खो-खो व कबड्डी या खेळाचे क्रीडा संघटक शिवाजी खांड्रे आणि कोल्हापूर येथील जिम्नॅस्टिक प्रशिक्षक शंकर आरोसकर यांना प्रदान करण्यात आला.हा सोहळा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे झाला. याप्रसंगी आॅलिम्पियन व मेजर ध्यानचंद पुरस्कारार्थी सय्यद हकीम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी सनदी अधिकारी कृष्णा भोगे, पूर्णवाद स्पोर्टस अॅण्ड हेल्थ प्रमोशन अकॅडमीचे सचिव मकरंद जोशी व जिल्हा जिम्नास्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी उपस्थित होते. यावेळी अश्विनी रोंघे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला म.सा.म.च्या खेळाडूंनी अॅक्रोबेटिक्स व एरोबिक्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी माजी प्राचार्य पी.के. तादालापूरकर, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, दासू वैद्य, औरंगाबाद जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय भिंगारदेव, मिलिंद महाजन, गोपाल पांडे, अमृत बिºहाडे आदी उपस्थित होते.
शिवाजी खांड्रे ‘क्रीडा तपस्वी’ पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:25 AM