शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वमुखी की उत्तरमुखी, विद्यापीठात आणखी एक वाद

By शांतीलाल गायकवाड | Published: September 19, 2022 2:19 PM

विद्यापीठातील पुतळा आणखी एका वादात अडकला असून पुतळ्याची दिशा चुकल्याचे आंबेडकराईट मूव्हमेंटने निदर्शनास आणून दिले आहे.

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठात उभारलेला छत्रपती  शिवाजी महाराजांचा पुतळा आता दिशेच्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी  अनावरण करण्यात आलेला हा पुतळा पूर्वमुखी असून, ही चूक विद्यार्थी संघटनांनी सोमवारी कुलगुरूच्या निदर्शनात आणून देत, पुतळ्याची दिशा बदलण्याची मागणी केली.

या मागणीने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अडचणीत आले असून त्यांनी या चुकीला पुतळा समितीला जबाबदार धरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यात व देशात उभारलेले पुतळे हे उत्तरमुखी आहेत. याचे कारण असे की, शिवरायांना उत्तर अर्थात दिल्लीचे तख्त पादाक्रांत स्वप्न होते. ते दर्शविण्यासाठी शिवाजी महाराजांचे पुतळे देशात कायम उत्तर मुखी असतात. याबाबत आंबेडकराईट मूव्हमेंटचे विजय वाहूळ यांनी कुलगुरुंना निवेदन दिले आहे. 

पुतळ्यावरून वाद शमेनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आला तेव्हापासून वाद सुरु आहेत. पुतळा असावा की नाही यावर पडदा पडून मंजुरी मिळाली. त्यानंतर पुतळा कसा असावा? नियोजित जागा बदलावी लागली.  त्यानंतर अनावरण पत्रिका आणि कोनशिलेवर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची नावे वगळण्यात आली. हा वाद थांबत नाही तोच आता पुतळ्याची दिशा चुकली असा वाद उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज