खुलताबाद तालुक्यातील विरमगाव- टाकळी राजेराय हा शिवरस्ता पावसाळ्यात पाण्यात राहत असल्याने परिसरातील जवळपास शंभर शेतकऱ्यांना व मुलांना पाण्यातून वाट काढत चालत जावे लागते. सदरील शिवरस्ता पाझर तलावात गेल्याने गतवर्षी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे कैफियत मांडली होती व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांनी प्रत्यक्ष येऊन स्थळ पाहणी, पंचनामासुद्धा केला होता. मात्र लॉकडाऊनचे निमित्त करून पुढील कार्यवाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे सरपंच सविता आधाने, धनाजी जाधव, मुरलीधर जाधव, पांडुरंग जाधव, परशराम आधाने, बंडू आधाने, मनोहर आधाने, सोमीनाथ चव्हाण, जगन चव्हाण, रशीद शेख, अहमद शेख, महमूद शेख, कडुबा जाधव, शैलेंद्र जाधव, काशीनाथ जाधव, वाल्मीक आधाने, भीमराव जाधव इत्यादी शेतकरी उपोषणाच्या तयारीत आहेत.
फोटो : शिवरस्ता पाण्यात गेल्याचे दाखविताना नागरिक.
230421\sunil gangadhar ghodke_img-20210423-wa0026_1.jpg
शिवरस्ता पाण्यात गेल्याचे दाखविताना नागरिक.