लातूर : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त तब्बल ११ हजार १११ नारळापासून २१ फुट उंचीचा शिवलिंग साकारण्यात आला आहे़ या शिवलिंगाची वंडरबुक आॅफ रेकॉर्डस इंटरनॅशनल या जागतिक विक्रम पुस्तकाने नोंद घेतली आहे़ हा शिवलिंग शिवभक्तांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे़ भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे़ महाशिवरात्रीनिमित्त लातुरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ११ हजार १११ नारळातून २१ फुट उंचीचा शिवलिंग साकारण्यात आला आहे़ या शिवलिंगाचे उद्घाटन झाले़ यावेळी ब्रह्माकुमार कलबुर्गी, सेवाकेंद्राच्या निर्देशिका राजयोगिनी ब्रह्माकुमार विजया बहेन, लातूर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नंदा व ब्रह्माकुमारी पुन्या त्याचबरोबर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार बसवराज पाटील, भिमाशंकर पोतीपवळे, अॅड़ त्र्यंबकदास झंवर, अभिजित देशमुख, वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनलच्या समन्वयक डॉ़ स्वर्ण, गुर्रम आदी उपस्थित होते़ हैद्राबादहून आलेल्या डॉ़ स्वर्ण व गुर्रम यांनी शिवलिंगाची पाहणी करून वंडर बुक आॅफ रेकॉर्डस् इंटरनॅशनलमध्ये याची नोंद केली जात असल्याचे जाहीर केले़
नारळातून साकारले शिवलिंग
By admin | Published: February 26, 2017 12:48 AM