प्रसाद कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणाऱ्या ‘शिवशाही’ या आरामदायी बसेस सुरू केल्या खºया; पण अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चेएसटीने आॅनलाईन तिकीट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’चे ब्रीदवाक्य मिरविणाºया एस. टी. ने ‘शिवशाही’च्या ‘आॅनलाईन बुकिंग’ची सोय केली आहे. औरंगाबाद येथील बुद्धिबळप्रशिक्षक एस. के. कुलकर्णी यांनीही गेल्या आठवड्यात नागपूरला जाण्यासाठी एस.टी. च्या संकेतस्थळावर वेळापत्रक पाहून ‘शिवशाही’चे आॅनलाईन तिकीटखरेदी केले. ते त्यांच्या नातवासह सिडको बसस्थानकावर सकाळी सव्वाआठ या नियोजित वेळेनुसार आले. पण या बसबाबत चौकशी केली असता अशी कोणतीही ‘शिवशाही’ त्यावेळी नसल्याचे सांगण्यात आले. चौकशी कक्षातील कर्मचाºयाने त्यांना, वेबसाईटवर ही चुकीची बस दाखवली गेली असल्याचे सांगितले. नियंत्रण कक्षाने कुलकर्णी यांना अकोल्यापर्यंत जाणा-या ‘शिवशाही’त बसवून दिले; इतकेच नव्हे तर अकोल्याच्या नियंत्रण कक्षास एक पत्र देऊन त्यांच्या नागपूर प्रवासाची सोय करून देण्याची सूचना केली. मात्र कुलकर्णी यांनी पूर्ण प्रवासाचे ‘शिवशाही’ चे पैसे भरूनही त्यांना अकोला ते नागपूर हा प्रवास साध्या बसने करावा लागला.जी गाडी रद्द केली, त्याची माहिती संबंधित प्रवाशापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था का केली गेली नाही? अशा प्रकारामुळे होणाºया मानसिक त्रासाचे काय, असे प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केले.आगारप्रमुख म्हणतात, समन्वयाचा अभावकोणतीही बस बंद करण्याआधी वेबसाईटवर एक महिना आधी तशी दुरुस्ती केली जाते. या घटनेत सदर प्रवाशाने बरेच दिवस आधी बुकिंग केली असावी व दरम्यान ही बस बंद झाली असावी. एस.टी. तील दोन विभागांच्या असमन्वयामुळे हे घडू शकते, अशी प्रतिक्रिया औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रमुख श्रीकृष्ण मुंजाळ यांनी ‘लोकमत’ला दिली. अशा कारणामुळे कोणाचा प्रवास रद्द झाल्यास त्यांनी दोन दिवसांच्या आत राज्यातील कोणत्याही आगारात तिकिटासह संपर्क साधावा. पडताळणी करून पैसे ‘आॅनलाईन’ परत केले जातात, असेही त्यांनी सांगितले.
अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे आॅनलाईन तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:48 AM