शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णांचे रेमडेसिविर पळवून काळ्याबाजारात विक्री; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 1:27 PM

remdesivir black marketing : कोविड सेंटरमधून इंजेक्शन चोरी करणारा मुख्य आरोपी अफरोजखान हा नेहमी रात्रपाळीलाच कामावर जात असे.

ठळक मुद्दे सापळा रचून पोलिसांनी एका पाठोपाठ सात आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडले. या टोळीला न्यायालयाने १ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे मृत्यूच्या दाढेत गेलेल्या रुग्णाला देण्यासाठी आणलेले आणि मयत झालेल्या रुग्णांचे उरलेले रेमडेसिविर इंजेक्शन आरोपी अफरोज कोविड सेंटरमधून पळवित असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याने साथीदारामार्फत आतापर्यंत किती रेमडेसिविर इंजेक्शन ब्लॅकमध्ये विक्री केले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला.

मुख्य आरोपी अफरोज खान इकबाल खान, दिनेश कान्हू नवगिरे (२८, जयभीमनगर टाऊन हॉल), साईनाथ अण्णा वाहुळ (रा. रामनगर), रवी रोहिदास डोंगरे (रा. भाग्यनगर), संदीप सुखदेव रगडे, प्रवीण शिवनाथ बोर्डे आणि नरेंद्र मुरलीधर साबळे (सर्व. रा. बदनापूर) या सात जणांच्या टोळीला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजारात विक्री करतांना गुन्हे शाखेने मंगळवारी पकडले. ऑनलाइन आगाऊ २० हजार रुपये पाठविल्यानंतर साध्या वेशातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना इंजेक्शन विकले होते. यानंतर सापळा रचून पोलिसांनी एका पाठोपाठ सात आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडले. त्यांच्याकडून पाच रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केली. या टोळीविरुध्द बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केली. या टोळीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले.

अफरोज घ्यायचा नाईट ड्युटीकोविड सेंटरमधून इंजेक्शन चोरी करणारा मुख्य आरोपी अफरोजखान हा नेहमी रात्रपाळीलाच कामावर जात असे. या कालावधीत डॉक्टर आणि नर्सची नजर चुकवून तो रेमडेसिविर इंजेक्शन चोरी करीत असे. यातील बहुतेक इंजेक्शन तो मृत्यूच्या दाढेत असलेल्या रुग्णाच्या नावे वॉर्डात आलेली अथवा उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णाची शिल्लक राहिलेली इंजेक्शन पळवित असे, असे त्याने पोलिसांना सांगितले.

कमिशन तत्त्वावर आणले एकत्ररेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी अफरोजने आरोपी साथीदारांची साखळी तयार केली होती. बऱ्याचदा अन्य आरोपी त्याच्याकडे मागणी नोंदवित आणि अफरोज इंजेक्शन चोरी करून आणून देई. यात प्रत्येकाचा कमिशनचा दर ठरलेला असे. जास्तीत जास्त दराने इंजेक्शन विक्री केल्यास जादा कमिशन तो देई.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीर