शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

धक्कादायक ! वडील व सावत्र आईने अल्पवयीन मुलीची तीन वेळा केली विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 12:17 PM

Rape on Minor Girl in Aurangabad : या प्रकरणात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्देअत्याचारानंतर गर्भपात करून लावून दिले लग्न

वाळूज महानगर : वडील व सावत्र आईने नातेवाइकांच्या मदतीने अल्पवयीन मुलीची गुजरात व अन्य दोन ठिकाणी विक्री केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून, लैंगिक अत्याचारानंतर या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करून पुन्हा लग्न लावले होते. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Shocking! The father and stepmother sold the minor girl three times) 

वाळूज एमआयडीसी परिसरात वडील व सावत्र आईसोबत पीडित अल्पवयीन मुलगी राहत होती. तीन वर्षांपूर्वी तिचे वडील, सावत्र आई, मावशी व काका यांनी संगनमत करून गुजरात राज्यात एका महिलेकडून २ लाख रुपये घेऊन या अल्पवयीन मुलीस विकले. गुजरातमध्ये विक्री केलेल्या महिलेच्या घरी दोघांनी पीडितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. पीडितेची प्रकृती खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला गुजरात येथून औरंगाबादला आणले. पीडिता घरी आल्यानंतर तिचे वडील व सावत्र आईने तिला मानसिक त्रास देऊन छळ केला. काही दिवसांनंतर या दोघांनी तिला नंदुरबार येथे एका इसमास विकले. त्या इसमाने पीडितेवर दोन महिने वेळोवेळी अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. पीडितेची प्रकृती खालावल्यामुळे खरेदी करणाऱ्या इसमाने तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

गर्भपात करून पीडितेचे लग्न लावून दिलेपीडित अल्पवयीन मुलीला वाळूज एमआयडीसीत परत आणल्यानंतर वडील व सावत्र आईने तिला बळजबरीने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला. काही दिवस उलटल्यानंतर आई-वडील व नातेवाइकांनी सातारा येथील एका इसमाकडून पैसे घेऊन त्याच्यासोबत पीडितेचे बळजबरीने लग्न लावून दिले. दरम्यान, सातारा येथे पतीने तिच्यावर सतत ८ ते ९ महिने अत्याचार केला. पतीकडून होणारा अत्याचार व मानसिक छळ असह्य झाल्यामुळे तिने मावशीसोबत संपर्क साधून मला घेऊन जा; अन्यथा मी आत्महत्या करेन, अशी धमकी दिली होती. मात्र, आई-वडील व नातेवाईक मदतीसाठी येत नसल्याने पीडितेने त्यांच्याविरोधात दहीवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

विक्री व अत्याचारप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हानातेवाइकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर पीडितेच्या काकाने तक्रार मागे घेण्यासाठी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे पीडिता बहिणीसोबत मुंबईला निघून गेली. त्यानंतर पीडितेने नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्यात आपली विक्री करणारे नातेवाईक, तसेच अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटना वाळूज एमआयडीसी हद्दीत घडल्याने हा गुन्हा हदगाव पोलिसांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एम.आर. घुनावत हे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद