शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ज्युनिअर विद्यार्थ्याची ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई 

By संतोष हिरेमठ | Published: June 14, 2024 7:32 PM

तिघे सहा महिन्यांसाठी सस्पेंड, २५ हजारांचा दंड; अन्य तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी हाॅस्टेल, ग्रंथालयात प्रतिबंध, त्यांनाही २५ हजारांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ज्युनिअर विद्यार्थ्याची सीनिअर्संकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन सीनिअर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून ६ महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच त्यांना हाॅस्टेलमध्ये कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे, तर रॅगिंगच्या वेळी उपस्थित असलेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी हाॅस्टेल आणि ग्रंथालयात प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच त्यांनाही प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

घाटीतील द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने रुग्णालय प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे यासंदर्भात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अँटी रॅगिंग कमिटीने तातडीने बैठक घेऊन विद्यार्थ्यांची तक्रारनुसार चौकशी केली. या चौकशीअंती रॅगिंग झाल्याचे स्पष्ट झाले. समितीच्या अहवालानंतर अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी याप्रकरणी नॅशनल मेडिकल काऊन्सिलच्या (एनएमसी) नियमानुसार कारवाई केली.

काय केले रॅगिंगमध्ये ?तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील काही वर्षांना ७ जून रोजी रात्री ओल्ड बाॅईज हाॅस्टेलमध्ये बोलावले. यावेळी सीनिअर्सनी ज्युनिअर विद्यार्थ्यांसोबत असभ्य भाषेत संवाद साधला. सिगारेट आणून द्या, मद्य आणून द्या, असे म्हणत काॅलर धरण्याचाही प्रकार केला. यामुळे संबंधित ज्युनिअर विद्यार्थी भयभीत झाला होता. अशा अवस्थेत त्याने तक्रार केली. त्याची स्थिती पाहून वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी त्याला धीर दिला. या घटनेनंतर तो विद्यार्थी आई-वडिलांसोबत गेला.

अँटी रॅगिंग कमिटीने केलेल्या सूचना..- सीनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थांना बैठकीसाठी रात्री बोलवू नये.- वसतिगृहात वार्डनने नियमितपणे राऊंड घ्यावे.- वसतिगृहातच खानावळ असावी.

पुन्हा पुनरावृत्ती नको, म्हणून कडक कारवाईभविष्यात रॅगिंगची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या (एनएमसी) नियमानुसार कडक कारवाई करण्यात आली आहे. त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा असा काही प्रकार केला तर त्यांचे प्रवेश रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्यक्ष बोलावून झालेली घटना व शिक्षा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असे कळविण्यात आले.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी