- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहरात दरवर्षी वेगवेगळ्या आजारांमुळे तब्बल ७ ते ८ हजार नागरिकांचा मृत्यू होतो. २०२० या वर्षात मृत्यूचा आकडा तब्बल ११ हजारांपर्यंत पोहोचला. मार्च २०२१ ला सुरुवात होताच अवघ्या बारा दिवसांमध्ये जवळपास ४०० नागरिकांचा कोरोनासह विविध आजारांनी मृत्यू झाला. मृत्यूचे हे आकडे शहराच्या चिंतेत प्रचंड भर घालणारे आहेत.
शहरात अनेक नागरिक आजही कोरोना नसल्याप्रमाणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन या नागरिकांकडून होत नाही. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनी स्वतःला शिस्त लावावी असे हजारो वेळेस प्रशासनाने सांगितले. मात्र त्याचा किंचितही परिणाम काही नागरिकांवर झालेला नाही. त्यामुळे शहरात कोरोना राक्षसासारखे रूप धारण करीत आहे. मागील वर्षभरात कोरोना आजाराने तब्बल ९३८ नागरिकांना जीव गमवावा लागला. एवढे सगळं होत असतानाही नागरिक अजूनही जबाबदारी झटकून देत आहेत. शहराने यापूर्वी डेंग्यू, मलेरिया आणि निमोनियामुळे नागरिकांचा मृत्यू होताना पाहिले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे सत्र एप्रिल २०२० पासून शहरात सुरू झाले. मार्च २०२१ मध्ये कोरोनामुळे मृत्यूचे आकडे आकाशाला आतापासूनच गवसणी घालत आहेत.
गत ४ वर्षांत मृत्यूचे आकडेवर्ष - एकूण मृत्यूसंख्या२०१७ - ७,२१६२०१८ - ८, २२४२०१९ - ८, ३५२२०२० - ११, १६४
२०२० - २१ मध्ये दरमहा मृत्यूमहिना - २०२० - २०२१ - कोरोना मृत्यूजानेवारी - ७४९ - ७७९ - ८५फेब्रुवारी - ६७८ - ७०९ - ७१मार्च - ६७३ - ४०० - ९७ (१२ मार्चपर्यंत)एप्रिल - ६२१ - ००० - ०६ (२०२०)मे - ९१५ - ००० - ८१जून - ११४४ - ००० - २३१जुलै - १०६८ - ००० - ३१४ऑगस्ट - ११८६ - ००० - ३५२सप्टेंबर - १२४८ - ००० - ४३२ऑक्टोबर - १२४९ - ००० - २५५नोव्हेंबर - ७९९ - ००० - १०६डिसेंबर - ८७० - ००० - १८०