शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

पशुगणनेत धक्कादायक आकडेवारी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख पशुधनाची घट !

By विजय सरवदे | Updated: March 11, 2025 15:15 IST

२१ व्या पशुगणनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक मोजणी

छत्रपती संभाजीनगर : २५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २१ व्या पशुगणनेस शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रत्यक्षात ही गणना फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, देशभरातच पशुगणनेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पशुगणना झाली असून, २० व्या पशुगणनेच्या तुलनेत यावेळी तब्बल दोन लाख पशुधनाची घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 

सन २०१९ मध्ये २० व्या पशुगणनेमध्ये पहिल्यांदाच पशूंची प्रजाती, ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात झाली. २० व्या पशुगणनेच्या अहवालानुसार जिल्ह्यात ११ लाख ४८ हजार २८३ पशुधन होते. आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक पशुगणनेचे काम पूर्ण झाले असून, त्यात ७ लाख ९६ हजार ३१२ पशुधनाची नोंद झाली आहे. अर्थात मागील पशुगणनेच्या तुलनेत सुमारे दोन लाख पशुधन कमी झाल्याची बाब समोर आली आहे.

या पशुगणनेत गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आणि महापालिका, नगरपंचायती, नगरपालिकांचे वार्डांत प्रगणकामार्फत ‘ॲप’द्वारे नोंदी घेतल्या जात आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १३६५ गावे आणि २४४ वार्डांचा समावेश असून, ७ लाख ६१ हजार ३१२ कुटुंबांच्या घरी जाऊन नोंदी घेण्यात आल्या आहेत. मार्च अखेरपर्यंत पशुगणना पूर्ण होऊन निश्चित आकडेवारी समोर येईल.

पशुधन घट होण्याची कारणेयासंदर्भात सूत्रांनी सांगितल्यानुसार प्रामुख्याने गोवंश जनावरांची संख्या वाढली आहे, तर म्हैैसवर्गांमध्ये मोठी घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. असेही सांगितले जात आहे की, शासनाने गोवंश हत्येवर बंदी आणल्यामुळे म्हैसवर्ग जनावरांचा कत्तलीसाठी जास्त वापर होत असावा. दुसरे असे की, अलीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक शहराकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पशुपालकांची संख्या घटत चालली आहे.

सोळा प्रकारच्या प्राण्यांची मोजणीयावेळी पाळलेले गाेवंश, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती, याक तसेच कुक्कुट पक्षी जसे की कोंबड्या, बदक, टर्की, इमू, क्वेल, गिनी, शहामृग, अशा सोळा प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, भटक्या गाई आणि भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांचीही माहिती गोळा करण्यात येत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद